Tarun Bharat

क्रेन कोसळून 11 ठार

आंध्रप्रदेशातील दुर्घटना : हिंदुस्तान शिपयार्ड कंपनीत प्रथमच मोठा घातपात

विशाखापट्टणम / वृत्तसंस्था

आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये शनिवारी एक भीषण दुर्घटना घडली. विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये पेन कोसळल्यामुळे 11 जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये हिंदुस्तान शिपयार्डच्या चार कर्मचाऱयांचा समावेश असल्याचे कंपनीच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. तसेच गेल्या 75 वर्षांच्या काळात हिंदुस्तान शिपयार्डमध्ये प्रथमच अशी घातक दुर्घटना घडल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

हिंदुस्तान शिपयार्ड कंपनीमध्ये नवीन क्रेन बसविण्याचे काम शनिवारी हाती घेण्यात आले होते. नवीन पेनची ट्रायल रन सुरू असताना हा अपघात झाला. दोन वर्षांपूर्वीच ही क्रेन आणण्यात आली होती. तथापि, मध्यंतरीच्या काळात वेगवेगळे कंत्राटदार बदलल्यामुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडत गेली होती. सदर क्रेन 70 टन वजनाची होती. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने मदत व बचावासाठी विशेष टीम घटनास्थळी पाठवली आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडला दिले आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनालाही उच्चस्तरीय समिती स्थापन करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिली.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

दुर्घटनेनंतर आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याप्रकरणी ट्विट केले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम जिल्हाधिकारी आणि शहराचे पोलीस आयुक्त यांना यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी याप्रकरणी 11 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पर्यटनमंत्री एम श्रीनिवास राव यांनी स्थानिक प्रशासनासोबत याबद्दल चर्चा केली आहे.

नातेवाईकांचा आक्रोश अन् आरोप

क्रेन दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका सुपरवायझरसह हिंदुस्तान शिपयार्डच्या चार कर्मचाऱयांचा समावेश आहे. अन्य सात जण कंत्राटी कामगार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर हिंदुस्तान शिपयार्डमध्ये काम करणाऱया अनेक कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले दाखल झाले होते. स्थानिक पोलीस आणि कंपनी व्यवस्थापनाकडून दुर्घटनेसंबंधी कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चौकशीसाठी समिती गठीत

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी हिंदुस्तान शिपयार्डकडून अंतर्गत समिती नियुक्त करण्यात आली आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेत विशाखापट्टणमच्या जिल्हाधिकाऱयांनीही स्वतंत्र चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये आंध्र इंजिनियरिंग कॉलेजमधील सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक विभागाच्या प्रमुखांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

सूरतमध्ये रसायनगळती, 6 जणांचा ओढवला मृत्यू

Amit Kulkarni

इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा

Patil_p

राहुल गांधींकडून देशाचा अपमान ः उपराष्ट्रपती

Patil_p

पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं

Archana Banage

श्रद्धाच्या मृतदेहाचे 10 तुकडे हस्तगत

Amit Kulkarni

कोरोनावरील उपचारासाठी एचआयव्हीच्या ‘या’ औषधांचा होणार वापर

prashant_c