मुंबई रसायन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी आपला आयपीओ भारतीय भांडवली बाजारात सादर करणार असल्याचे समजते. सदरच्या आयपीओतून कंपनी 1300 ते 1400 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगितले जाते. फार्मा आणि ग्राहकोपयोगी वस्तुंच्या कंपन्यांकरीता सदरची कंपनी विशेष रसायन तयार करते. कंपनी आपल्या आयपीओसाठी या आठवडय़ामध्ये भांडवली बाजारातील नियामक सेबीकडे अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. या आधी बाजारात सादर करण्यात आलेल्या रोसारी बायोटेक आणि केमकॉन स्पेशालिटी केमिकल यांच्या आयपीओना गुंतवणूकदारांचा अनुक्रमे 79, 149 पट प्रतिसाद मिळाला आहे. यावरून क्लिन सायन्सलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा वाटते आहे.


previous post