Tarun Bharat

क्लिफर्ड मिरांडा एफसी गोवाचे आता अंतरिम प्रशिक्षक

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

जुआन फॅरांडोने एफसी गोवाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर संघ व्यवस्थापनाने पुढील व्यवस्था होईपर्यंत क्लबचे सहाय्यक प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांची संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

जुआनने एफसी गोवाला सोडचिठ्ठी दिल्याने आम्ही नाराज झाल्याचे फुटबॉल संचालक रवी पुष्कर म्हणाले. क्लब सोडण्याचा त्यांचा निर्णय अनपेक्षित होता आणि त्यांच्या या निर्णयाने आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. सध्या आम्ही आयएसएय फुटबॉल स्पर्धेच्या मध्याला आहोत आणि त्यांचे संघाला अचानक सोडून जाण्याने आम्ही निराश झाल्याचे रवी पुष्कर म्हणाले.

आम्हाला जुआन यांनी अंधारात ठेवले. मात्र, एकदा त्यानी आपली भूमिका सांगितली आणि रिलीझ क्लॉज सक्रिय झाल्यानंतर आमच्याकडे फारसा पर्याय नव्हता. आमी जुआन फॅरांडोला त्याच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे रवी पुष्कर म्हणाले. जुआनने 2020-21 मध्ये एफसी गोवा संघाला आयएसएलच्या उपान्त्य फेरीत नेले होते तर एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत तिसरे स्थान मिळवून दिले होते.

Related Stories

काँग्रेस आमदार राजेश फळदेसाई यांची भाजप स्थापना दिन कार्यक्रमात उपस्थिती

Amit Kulkarni

सांखळीत महाशिवरात्रीनिमित्त शिक्षकांनी बनविले पर्यावरणप्रिय प्रवेशद्वार

Amit Kulkarni

वरूणापुरी ते हेडलॅण्ड सडापर्यंतच्या राष्ट्रीय चौपदरी महामार्गाचे उद्घाटन

Amit Kulkarni

काँग्रेसमध्ये आणखीन बंडखोर असल्यास त्यांचा शोध घ्या

Patil_p

पोलिसांची 24 तास ऑन डय़ुटी

tarunbharat

कथ्थक नृत्य शिक्षिका शुभलक्ष्मी मांद्रेकर यांचे निधन

Amit Kulkarni