Tarun Bharat

क्लोजडाऊनमुळे बेळगाव पासपोर्ट कार्यालय बंद

पुढील आदेश मिळाल्यानंतर सुरू होणार कार्यालय

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागल्याने राज्य सरकारने 10 मेपर्यंत क्लोजडाऊन जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील सर्व पासपोर्ट कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगावमध्ये असणारे पोस्ट-पासपोर्ट कार्यालयदेखील क्लोजडाऊनमुळे बुधवारपासून बंद करण्यात आले आहे.

बेळगावमधील जनतेला पासपोर्ट काढता यावा यासाठी पोस्ट खात्याच्या सहकार्याने कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या कार्यालयातून बेळगाव जिल्हय़ातील नागरिकांना पासपोर्ट काढणे सोयीचे ठरत होते. परंतु क्लोजडाऊनमुळे यावर आता निर्बंध आले आहेत. मंगळवारी रात्री बेंगळूर येथील मुख्य कार्यालयातून ई-मेल आला असून बुधवारपासून कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे.

पुढील आदेश येईपर्यंत कार्यालय बंद

मुख्य कार्यालयातून कळविण्यात आल्याप्रमाणे बुधवारपासून पासपोर्ट सेवा केंद्र बंद करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत कार्यालय बंद ठेवले जाणार आहे. कार्यालय सुरू झाल्यानंतर ज्यांच्या अपॉईंटमेंट त्याप्रमाणे प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे पासपोर्ट कार्यालय, कर्मचारी कृष्णा तळवार यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.

Related Stories

बेजबाबदारपणामुळे मतदानापासून वंचित

Amit Kulkarni

टेलिमेडिसीनद्वारे उपचारात बेळगाव अव्वल

Amit Kulkarni

बसवणकुडची येथील वॉर्डकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

जिल्हय़ात 106 रुग्ण झाले कोरोनामुक्त

Amit Kulkarni

सोमवार पेठेतील गटारीत गवत अन् कचरा

Amit Kulkarni

जिल्हय़ाला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा

Amit Kulkarni