Tarun Bharat

‘क्लोजडाऊन’ला खानापूर परिसरात प्रतिसाद

सकाळी 10 नंतर दुकानांचे शटर डाऊन, शहरात शुकशुकाट : महामार्गावर वाहनांची रेलचेल, रुग्णसंख्या वाढल्याने धास्ती

वार्ताहर / खानापूर

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी रात्रीपासून क्लोजडाऊन नियमावली जाहीर केल्यानंतर बुधवारी खानापूर शहर व परिसरात या क्लोजडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात झाली आहे. खानापूर शहरात सकाळी दहाचा ठोका झाल्यानंतर पोलिसांनी गस्त घालून सर्व व्यापाऱयांसह व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. शहरात सकाळी सहापासून दहा वाजेपर्यंत झालेली तुफान गर्दी हटवण्यासाठी पहिल्या दिवशी पोलिसांना कसरत करावी लागली. पोलिसांची गाडी वाजू लागताच व्यापाऱयांसह ग्राहकांची धावपळ सुरू झाली व दहानंतर अवघ्या एका तासाभरात शहरातील बाजारपेठ पूर्णतः ठप्प झाली.

 बुधवारी क्लोजडाऊन या आदेशामुळे दुपारनंतर शहर परिसरात शुकशुकाट पसरला होता. मात्र खानापूर शहरांतर्गत महामार्गावर वाहनांची रेलचेल सुरूच होती. दुचाकी, चारचाकी वाहनधारक रस्त्यावरून अल्पप्रमाणात ये-जा करत होते. त्यामुळे शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात या क्लोजडाऊन नियमावलीचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले. राज्य सरकारने कठोर नियमावली जाहीर करून आगामी 14 दिवस कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात क्लोजडाऊनची स्थिती निर्माण झाली असून खानापूर तालुक्मयातही चांगलाच प्रतिसाद मिळाला. खानापूर शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सकाळी दहानंतर कसरत केली. नागरिकांनीही तसा प्रतिसाद दिला व शहरातील नागरिकांची तसेच खेडय़ापाडय़ातील बाजारासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी तसेच दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची थोडय़ाफार प्रमाणात दिवसभर रेलचेल सुरू होती. पण बाजारपेठेतील सर्व व्यापार पूर्णतः बंद झाल्याने या बुधवारच्या क्लोजडाऊनच्या पहिल्या दिवशी मात्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

 तालुक्मयामध्ये कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्या आसपास असल्याने शहरातील नागरिकांतही धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या आहे. त्यातच नंदगड येथे एका बाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अधिकच धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे खानापूर तसेच नंदगड पोलिसांनीही यासंदर्भात सतर्कता राखत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 मागील वषी लॉकडाऊनच्या काळामध्ये व त्यानंतर आलेल्या कोरोना संक्रमणाच्या धास्तीने नागरिकांना लॉकडाऊन अथवा क्लोजडाऊन कशाप्रकारे केला जाते, याची धास्ती असल्यामुळे खानापूर शहराकडे अनेकजणांनी बुधवारी पाठ फिरवली. जीवनावश्यक वस्तूंच्या तसेच शेती बागायतींच्या वाहनासाठी मुक्त संचार असल्याने शहरांतर्गत महामार्गावरून तसेच प्रमुख रस्त्यावरून वाहनांची दिवसभरात गर्दी दिसून येत होती. पण पोलिसांच्या धाकामुळे अनेक दुचाकीस्वार शहराकडे पाठ फिरवताना दिसत होते.  एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपंचायतीने भाजीपाला मार्केट शहर परिसराच्या 23 चौकांमध्ये खुल्या जागेवर केल्यास गर्दीवर नियंत्रण आणता येईल असेसुद्धा नागरिकांचे मत आहे. वास्तविक जीवनोपयोगी वस्तूसाठी सकाळी दहापर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले जात असले तरी बुधवारी पहिल्या दिवशी तुफान गर्दी पाहता काही किराणी व्यापारी वाजवी दर आकारण्यास सुरुवात केली आहे.

मागील वषी किराणा मालाचे दर अवाच्या सव्वा करण्यात आल्याने सर्वसामान्यांची पिळवणूक झाली. सर्वसामान्य लोक लॉकडाऊनमुळे मागील वषी लुटले गेले. पुन्हा यावषी अशीच परिस्थिती होणार का? या धास्तीमुळे ग्रामीण भागातील लोक बाजारासाठी एकच गर्दी करत आहेत. याचा गैरफायदा काही किराणा दुकानदार घेत असल्याने आतापासूनच यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. पण राज्य सरकारने जाहीर केलेल्या क्लोजडाऊन नियमावलीमध्ये आगामी चौदा दिवस सकाळी दहापर्यंत जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री करण्यासाठी मुभा राहणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे नागरिकानी एकाचवेळी गर्दी करू नये, एखाद्या किराणा व्यापाऱयाने जीवनोपयोगी साहित्याची रक्कम अधिक आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनानेही दिले आहे. याची खबरदारी प्रत्येक दुकानदाराने घ्यावी व कोणत्याही परिस्थितीत किराणा मालाचे दर वाढवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले
आहे.

भाजीमार्केट-फळमार्केट तालुका क्रीडांगणावर

खानापूर शहरात होणारी वाढती गर्दी लक्षात घेता शहरातील भाजीपाला मार्केट तसेच फळमार्केट तालुका क्रीडांगणावर हलवण्यात आले आहे. आणि या ठिकाणी एकच गर्दी होत असल्याने नियमावलीचा फज्जा मात्र उडताना दिसत आहे. सकाळी दहापर्यंत या भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी झाली होती. भाजी मार्केटच्या बाजारपेठेसाठी तालुका क्रीडांगणाची निवड करण्यात आली असली तरी या ठिकाणी दुकानांचे गाळे मार्किंग करून देण्यात आलेली पद्धत चुकीची आहे. एकाच ठिकाणी मार्किंग गाळे करण्यात आल्याने या भाजीपाला व फळमार्केटमध्ये मोठी गर्दी होत आहे. यासाठी एक तर तालुका क्रीडांगणावर विरळ जागेवर भाजी मार्केट अथवा फळ मार्केट विस्तारित करून देण्यात यावे किंवा खानापूर शहरातील जांबोटी सर्कल तालुका क्रीडांगणासह अन्य दोन ठिकाणी भाजी मार्केट व फळ मार्केटसाठी सुविधा करून देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

गर्लगुंजी येथे आधुनिक पद्धतीच्या व्यायाम शाळेचे उद्घाटन

Amit Kulkarni

पगारासाठी कामगारांची मनपावर धडक

Omkar B

बेळगुंदी येथे आज हुतात्म्यांना अभिवादन

Patil_p

शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तभांवर फडकविला राष्ट्रध्वज

Tousif Mujawar

कॅन्टोन्मेंट रुग्णालय बाहय़ रुग्णांसाठी ठरतेय सोयीचे

Amit Kulkarni

दिलासादायक : लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जनात घट

Archana Banage