Tarun Bharat

क्लोजडाऊन शब्द ऐकताच मद्यशौकिनांची तारांबळ

15 दिवसांचा स्टॉक घेण्यासाठी सुरू होती धडपड

प्रतिनिधी / बेळगाव

राज्य सरकारने दुपारी क्लोजडाऊन करण्याचे जाहीर केले. त्यामुळे अचानकपणे मद्यशौकीन खडबडून जागे झाले. दुकाने बंद होणार म्हणून खरेदी करण्यासाठी बार आणि वाईन शॉपसमोर मोठी गर्दी केली. एमआरपी दुकानांसमोर तर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर दररोज सरकार वेगवेगळे आदेश काढताना दिसत आहे. सध्यातरी मद्य विक्रीला मुभा दिली आहे. तरीदेखील क्लोजडाऊन म्हटल्यानंतर मद्यशौकीन अनेकांना फोन करून तसेच मेसेज करून दुकाने बंद राहणार की उघडी राहणार याचीच चौकशी करत होते.

दुकाने तब्बल 15 दिवस बंद राहणार अशी अफवा पसरली. त्यामुळे मद्यशौकिनांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. कारण मागीलवेळी लॉकडाऊन झाले, त्यावेळी मद्यपींना मोठी कसरत करावी लागली होती. अनेक जण सकाळी दुकाने सुरू आहेत का? याची पाहणी करत होते. काही जण दारूसाठी गयावया करत होते तर अनेक मद्यशौकिनांनी चारपट अधिक दर देऊन मद्य खरेदी केले होते. एकूणच मागील वेळेचा अनुभव पाहून काहीही असू दे पण 15 दिवसांचा स्टॉक करायचा निर्णय घेऊन अनेकांनी मोठी खरेदी केली. रेशन दुकानांसमोर ज्या प्रकारे रांग लागते त्या प्रकारेच मद्यांच्या दुकानांसमोर काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. काहींना फोनवरून त्यांचे मित्र आपलेही पार्सल आणण्यास सांगत होते.

Related Stories

स्वच्छता निरीक्षकांकडे बंदोबस्ताची जबाबदारी

Amit Kulkarni

बेशुद्धावस्थेतील व्यक्तीला केले हॉस्पिटलमध्ये दाखल

Amit Kulkarni

१० डिसेंबर रोजी एसपी “फोन-इन्”

Rohit Salunke

निवडणुकीसाठी सीमा हद्दीवर पोलीस बंदोबस्त

Patil_p

कागवाडला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने विकासकामांना गती मिळणार

Patil_p

जंगलाच्या हक्काची लढाई म्हणजे नव्या स्वातंत्र्याची लढाई

Amit Kulkarni