तरुण भारत

क्वाडला मिळणार दक्षिण कोरियाची साथ

हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनला रोखण्यास मदत

वृत्तसंस्था / सोल

Advertisements

बिघडती जागतिक व्यवस्था आणि क्षेत्रीय तणावामुळे दक्षिण कोरियाचे नवे अध्यक्ष यून सुक-योल हे राष्ट्रीय सुरक्षेवरून दबावात आहेत. याचदरम्यान आशिया-प्रशांतमध्ये चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला रोखण्यासाठी स्थापन सुरक्षा व्यासपीठ क्वाडचा हिस्सा होण्याची त्यांची इच्छा आहे. उत्तर कोरियापासून सदैव असणाऱया धोक्यादरम्यान दक्षिण कोरिया जागतिक शक्तींसोबत संरक्षण संबंध घनिष्ठ करणार आहे.

याचबरोबर दक्षिण कोरिया स्वतःचा व्यापारी भागीदार असलेल्या चीनच्या विरोधाची अधिक जोखीमही पत्करू शकत नाही. यून यांच्यासमोर याचमुळे विचित्र स्थिती निर्माण झाल्याने ते क्वाडमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहेत. अध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या एक आठवडय़ापूर्वी 3 मे रोजी यून यांनी सोलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या राजदूत कॅथरीन रॅपर यांची भेट घेत क्वाडच्या कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे समर्थन मागितले. या भेटीच्या तीन दिवसांनी यून यांनी भारतीय राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांची भेट घेत क्वाडच्या कार्यक्रमांचा हिस्सा होण्यासाठी समर्थन मागितले आहे. यून 21 मे रोजी सोल येथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे स्वागत करणार आहेत. 24 मे रोजी टोकिया येथे होणाऱया क्वाडच्या बैठकीत पर्यवेक्षक म्हणून सामील होण्याची अनुमती यून मागणार असल्याचे मानले जात आहे.

फुमियो किशिदा यांच्या नेतृत्वाखालील जपान सरकार दक्षिण कोरियातील यापूर्वी सरकारांसोबत असलेले मतभेद मागे सोडण्याचा आणि सोलसोबत अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहे. या क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या विरोधात एक आघाडी तयार करण्याचा प्रयत्न जपानकडूनही सुरू आहे.

दक्षिण कोरियाला क्वाडमध्ये सामील करण्यासाठी अमेरिका देखील इच्छुक आहे. दक्षिण कोरियात अमेरिकेचे सैनिक तैनात असून दोन्ही देशांचा मुख्य उद्देश चीनला रोखणे आहे. समस्या केवळ दक्षिण कोरियाच्या चीनसोबतच्या व्यापारावरून उद्भवणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.

चीनकडून इशारा

क्वाडमध्ये सामील होण्याच्या दक्षिण कोरियाच्या निर्णयावर चीन कसा व्यक्त होणार हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु चीन क्वाडकडे नाटोचा विस्तार म्हणून पाहत आहे. दक्षिण कोरिया क्वाडमध्ये सहभागी झाल्यास याला शत्रुत्वाची भावना मानण्यात येणार असल्याचा इशारा चीनने यापूर्वीच ग्लोबल टाईम्समधून दिला आहे. दक्षिण कोरियाचे सरकार आतापर्यंत चीनविरोधी व्यासपीठांपासून अंतर राखत आले आहे. 

चीनबद्दल साशंक

दक्षिण कोरियात अध्यक्ष यून सुक-योल यांचे नवे सरकार मात्र क्वाडचा हिस्सा होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त करत आहे. जागतिक स्तरावर उत्तर कोरियासोबतचे संबंध सांभाळण्यासाठी चीन हा दक्षिण कोरियासाठी महत्त्वाचा देश आहे, परंतु चीनकडून होणाऱया सहाय्याबद्दल दक्षिण कोरिया साशंक आहे. दुसरीकडे अमेरिकेसोबतची कित्येक वर्षे जुनी आघाडी दक्षिण कोरियाच्या सुरक्षेच्या केंद्रस्थानी आहे. दक्षिण कोरियाचे नेते आणि जनता ही सुरक्षा आघाडी कायम ठेवण्याच्या  बाजूने आहे.

Related Stories

अमेरिका हिंसाचार : 24 राज्यात 17 हजार सुरक्षा सैनिक तैनात

datta jadhav

सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी : 35 ठार, 48 जखमी

prashant_c

5 आखाती देशांचा इस्रायलसोबत व्यवहार

Patil_p

खरेदीसाठीही आता सम-विषय फॉर्म्युला

Patil_p

युक्रेन युद्धात पुतीन यांचे धार्मिक कार्ड

Patil_p

204 दिवसांमध्ये भारतात बळींचा आकडा लाखापार

Patil_p
error: Content is protected !!