Tarun Bharat

क्वारंटाईनमधील नागरिकांची संख्या वाढतीच

साडेचार हजारांहून अधिक जण 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. परराज्यांतून जिल्हय़ात येणाऱयांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे 4 हजार 534 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाला जिल्हय़ातील 1818 जणांच्या स्वॅब तपासणीची प्रतीक्षा असून  12 हजार 855 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 1927 जणांनी 14 दिवसांचे तर 6353 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले असून सध्या 41 बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यांत 11 हजार 559 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 9 हजार 424 अहवाल निगेटिव्ह तर 140 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 140 असून हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 106 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित 41 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.

Related Stories

बऱयाच महिन्यांनी शनिवारची बाजारपेठ बहरली

Patil_p

परीक्षा घोटाळा; आणखी चौघांना अटक

Amit Kulkarni

वसती बसेस बंद झाल्याने दक्षिण भागातील ग्रामस्थांचे हाल

Amit Kulkarni

तालुका पंचायतमध्ये गांधी व पं. शास्त्री जयंती

Patil_p

इ. 7 वी ते 9 वीची परीक्षा रद्द

Tousif Mujawar

खानापुरात प्रो कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Omkar B