Tarun Bharat

क्वारंटाईनमधून 21 जणांची सुटका

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातील मध्यवर्ती भागातील दोन लॉजमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या 21 जणांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे शुक्रवारी रात्री त्या सर्व 21 जणांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असणाऱयांच्या संपर्कातील 21 संशयितांना मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या दोन लॉजमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मार्केट पोलीस या दोन्ही लॉजवर लक्ष ठेवून होते. संबंधितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी स्वॅब तपासणीचे अहवाल उपलब्ध झाले असून त्यामुळे एका लॉजमधील 19 व आणखी एका लॉजमधील 2 असे एकूण 21 जणांना घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे. मध्यवर्ती भागातील लॉजमध्ये संशयितांना ठेवण्यास स्थानिकांचा विरोध झाला होता.

Related Stories

पंजाबचा हरदीप सिंग चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

Amit Kulkarni

ज्योतीनगर दुरवस्थेबद्दल पीडीओ धारेवर

Amit Kulkarni

खूनप्रकरणी आणखी पाच जणांना अटक

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे

Amit Kulkarni

दहावी पुरवणी परीक्षेच्या मूल्यमापनास प्रारंभ

Omkar B

विशेष मुलांप्रती संवेदनशील असणाऱया रुपा शरत कुमार

Patil_p