Tarun Bharat

क्विटोव्हा, थिएम, सीगमंड उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

सिनर, सित्सिपस, रुबलेव्ह यांचीही आगेकूच, व्हेरेव्ह स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था/ पॅरिस

झेक प्रजासत्ताकची डावखुरी टेनिसपटू पेत्रा क्विटोव्हाने आठ वर्षांनंतर प्रथमच प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. याशिवाय लॉरा सीगमंड, डॉमिनिक थिएम, सित्सिपस, आंद्रेय रुबलेव्ह, सिनर यांनीही आगेकूच केली आहे. जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हला तसेच डिमिट्रोव्हला मात्र चौथ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला.

सातवे मानांकन मिळालेल्या क्विटोव्हाने चीनच्या झँग शुआईचा 6-2, 6-4 असा पराभव करून पुढील फेरी गाठली. सरळ सेट्समध्ये मिळविलेला तिचा हा सलग चौथा विजय आहे. अनेक बडय़ा खेळाडू स्पर्धेबाहेर पडल्या असल्याने विम्बल्डन स्पर्धा दोनदा जिंकलेल्या क्विटोव्हाला येथे जेतेपदाची संधी आहे. तिची उपांत्यपूर्व लढत जर्मनीच्या बिगरमानांकित 32 वर्षीय लॉरा सीगमंडशी होणार आहे. तिने स्पेनच्या पॉला बडोसाची घोडदौड 7-5, 6-2 अशी रोखत आगेकूच केली आहे.

पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या तिसऱया मानांकित थिएमने फ्रान्सच्या हय़ुगो गॅस्टनची स्वप्नवत घोडदौड 6-4, 6-4, 5-7, 3-6, 6-3 अशी संघर्षपूर्ण लढतीत रोखली. मागील दोन स्पर्धांत थिएमला येथे नदालकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. 20 वर्षीय गॅस्टनवर विजय मिळविताना खूप झगडावे लागल्याने तो काहीसा निराश झाला होता. त्याची पुढील लढत 12 व्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनशी होणार आहे. जर्मनीच्या व्हेरेव्हचे आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. ताप आणि श्वसनाचा त्रास होत असूनही तो या सामन्यात खेळला होता. इटलीचा युवा खेळाडू यानिक सिनरने त्याला 6-3, 6-3, 4-6, 6-3 असे पराभूत पेले. गेल्या शुक्रवारी झालेल्या तिसऱया फेरीच्या सामन्यापासून तो आजारी होता. या सामन्यात आपण खेळायला नको होते, अशी प्रतिक्रिया व्हेरेव्हने नंतर व्यक्त केली.

अन्य सामन्यात पाचव्या मानांकित स्टेफानो सित्सिपसने 18 व्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हवर 6-3, 7-6 (11-9), 6-2 अशी मात केली तर 13 व्या मानांकित आंदेय रुबलेव्हनेही उपांत्यपूर्व फेरी गाठताना फुक्सोविक्सचा 6-7 (4-7), 7-5, 6-4, 7-6 (7-3) असा पराभव केला.

Related Stories

लेंडल सिमन्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

जपानची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

Patil_p

युवराज सिंगचा पुढाकार, पंतप्रधान निधीसाठी 50 लाख

Patil_p

जोस बटलर करणार वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा लिलाव

Patil_p

लिव्हरपूलकडून प्रिमियर लिगचा विजयाने समारोप

Patil_p

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने घेतली कोरोनाची पहिली लस, केले ‘हे’ आवाहन

Tousif Mujawar
error: Content is protected !!