Tarun Bharat

क्षमा करणें तुम्हांसि उचित

स्वधर्म आचरताना न कळत आपल्याकडून अधर्माचरण कसे घडले हे सांगताना नृग राजा पुढे म्हणाला –

विनयें दोघांही द्विजांप्रति । प्रार्थना केली बहुतां रीती ।  परि ते न मनूनि माझी विनती । आग्रहाप्रति वश्य झाले । मग ऐकैका पृथक्पृथक । करुणा भाकिली जरी सम्यक ।  तरी नायकतीच ते विवेक। क्रोधोन्मुख प्रज्वळले । मग प्रथम विप्राप्रति । लक्ष धेनु निष्क्रयार्थी ।  अर्पूनि पूर्व याचिली निगुती । परि तो विनती न मनीच । मग द्वितीय बाह्मणा प्रार्थना केली। लक्ष धेनु घेऊनि पहिली ।  ज्याची त्यासी देवविली । तो हे बोली न मनीच । ऐसें जाणोनि अतिसंकट । दुःखें दाटला माझा कंठ ।

पुढती चरणीं ठेवूनि मुकुट । प्रार्थिले वरि÷ द्विजवर्य।

तुम्ही दोघेही कृपावंत । अनुग्रहें कीजे मज सनाथ ।

किंकराचा अपराध बहुत । क्षमावंतीं क्षमावा ।

नेणतां घडलें हें अनुचित । क्षमा करणें तुम्हांसि उचित ।

नरकीं पडतों मी अनाथ । येथूनि मातें उद्धरिजे ।

अशुचि नरक अंधतम । तेथ पडतों मी अज्ञान अधम ।

कृपावंत होवोनि परम । मातें निस्सीम उद्धरावें ।

अनवधानतेमाजी ऐसें । संकट प्राप्त झालें असे ।

तुम्हीं सुकृतेरं सदयमानसें । मज दासातें तारावें ।

नृगराजा आपली कर्म कथा सांगताना पुढे म्हणाला – मी धर्मसंकटात सापडलो आणि त्या दोघांना अत्यंत नम्रतेने म्हणालो की, ‘हिच्या बदल्यात मी आपणास एक लक्ष उत्तम गाई देईन. आपण ही गाय मला परत द्या. मी आपला सेवक आहे. नकळतपणे माझ्या हातून हा अपराध घडला आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि मला अमंगळ नरकात जाऊन पडण्याच्या संकटातून वाचवा.’

ऐसे ब्राह्मण नानापरी । प्रार्थिले असतां मधुरोत्तरिं।

जे बोलिले प्रत्युत्तरिं । तें अवधारिं जगदीशा ।

प्रथम प्रतिग्राहक द्विजाग्रणी । तो निश्चयें बोलिला वाणी ।

लक्ष धेनु अंगीकारूनि । चोर होऊनि मी न वचें ।

प्रथम प्रतिगृहीता हे माझी । मजला धेनु न देसी आजी ।

तरी मी येथ द्विजसमाजीं । तास्कर्यदोषा पावेन ।

तुजला संकट पडलें जरी । तरी माझी धेनु ठेवीं घरिं।

तेणें दूषण दत्तपहारिं । तुझिये शिरिं मज नाहीं ।

ऐसें बोलोनि ब्राह्मणोत्तम । टाकूनि गेला निजाश्रम।

यावरी दुसरा द्विजसत्तम । वदला विषम तें ऐका ।

अरे राया दानशूरा । दातयांमाजी परम चतुरा ।

मम धेनूचिया प्रतिकारा । लक्ष अपरा देतोसी ।

दहा सहस्र त्याहीवरी । धेनु देऊं पाहसी जरी ।

तरी मी स्वधेनूवीण दुसरी । नाङ्गीकारिं कल्पान्तीं।

सायुत नियुत सह मम धेनु । घेऊनि तूंचि हो संपन्न ।

आम्हांसि देता श्रीभगवान । ऐसें बोलोनि तो गेला।

धेनु त्यागोनि विप्र दोन्ही । गेले निजाश्रमालागूनी ।

मग मी पडलों चिन्तवणीं । यावन्मरणपर्यंत । Ad.  देवदत्त परुळेकर

Related Stories

चला, योग करुया… निरोगी राहूया

Patil_p

बेकारीला पर्याय : स्वयंरोजगाराचा उपाय

Amit Kulkarni

आत्मविश्वास!

Patil_p

म्हादई आमी आई, होऊ तो उतराई!

Patil_p

कोरोना लढाई निर्णायक वळणावर

Patil_p

गंभीर प्रकार

Amit Kulkarni
error: Content is protected !!