Tarun Bharat

क्षी जिनपिंग यांच्यासाठी चीनमध्ये शुद्धीकरण मोहीम

न्यायपालिका, पोलीस दलातील समर्थकांची ओळख पटविणार

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनमध्ये अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा कार्यकाळ 2023 मध्ये पूर्ण होणार असला तरीही त्यांनी सत्तेवरील पकड कायम ठेवण्यासाठी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. 8 वर्षांपासून सर्वोच्च पदावर असलेल्या जिनपिंग यांची ही मोहीम देशांतर्गत सुरक्षा दलासाठी चिंतेचे कारण ठरली आहे.  चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने बहुप्रतीक्षित शुद्धीकरण मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या मोहिमेच्या अंतर्गत कम्युनिस्ट पक्ष आणि सर्वोच्च नेते क्षी जिनपिंग यांच्याबद्दल विरोधाची भूमिका बाळगणाऱया पदाधिकाऱयांची ओळख पटविण्यात येणार आहे. 1990 नंतर देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेत चालविली जाणारी ही सर्वात मोठी मोहीम असल्याचे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या मोहिमेद्वारे पोलीस, गुप्त पोलीस, न्यायपालिका आणि तुरुंगांमधील यंत्रणा पूर्णपणे प्रामाणिक आणि विश्वासार्ह राहतील हे निश्चित करण्यात येणार आहे.

1940 च्या प्रारंभी राबविण्यात आलेल्या सुधारणा मोहिमेप्रमाणेच ही मोहीम असल्याचे अधिकारी मानत आहेत. त्या काळात कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन नेते माओ यांनी नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी व्यापक सफाई मोहीम राबविली होती. चीनमध्ये 1990 नंतर पहिल्यांदाच अशाच आणखी एक मोहिमेची गरज व्यक्त केली जात होती.

10 वर्षांचे ब्ल्यू प्रिंट

चीनची सर्वात मोठी वार्षिक राजकीय बैठक गुरुवारपासून सुरू होणार आहे. या बैठकीत 14 व्या पंचवार्षिक योजनेचा खुलासा करण्यात येणार आहे. तसेच क्षी जिनपिंग यांच्या व्हिजन-2035 वरही चर्चा होणार आहे. याच्या माध्यमातून देशात अनुकूल वातावरण निर्मिती करत जिनपिंग यांच्या तिसऱया कार्यकाळाचा मार्ग प्रशस्त करण्यात येणर आहे. जिनपिंग यांना तिसरा कार्यकाळ मिळू नये अशी कम्युनिस्ट पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा आहे. पण या नेत्यांची संख्या जिनपिंग यांच्या समर्थकांच्या तुलनेत कमी आहे.

Related Stories

भौतिक शास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना

Patil_p

महात्मा गांधींच्या पुतळय़ाची न्यूयॉर्कमध्ये तोडफोड

Patil_p

मलेशिया : टाळेबंदी 2 आठवडय़ांनी वाढली

Patil_p

विमानाला लटकून प्रवासाचा प्रयत्न; अफगाणी फुटबॉलपटूचा मृत्यू

datta jadhav

”युद्ध सुरू झाल्यापासून आम्हांला मदत मिळालेली नाही”

Abhijeet Khandekar

चिनी जहाजांना मासेमारीसाठी परवानगी; पाकिस्तान सरकारविरोधात मच्छीमारांचे आंदोलन

datta jadhav