Tarun Bharat

क. बीड. रोजगार हमी योजनेतून सव्वा कोटींच्या कामांचा गणेशवाडीतून शुभारंभ

प्रतिनिधी / करवीर :

        गणेशवाडी तालुका करवीर येथील प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतींचे कंपाउंड व वॉल कामाचा शुभारंभ करवीर पंचायत समितीचे माजी सभापती श्री. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम गणेशवाडी ग्रामपंचायतचे सरपंच दादासो लाड (संचालक कुंभी कासारी कारखाना कुडित्रेयांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते श्री. राऊ माने हे होते.

       यावेळी राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, बरेच दिवस प्राथमिक शाळांसाठी व त्यांच्या संरक्षण भिंतीसाठी अशी कोणतीच योजना नव्हती ज्यातून शाळेतील होणारी तोडफोड दुरुस्त करू शकू पण, रोजगार हमी योजना अंतर्गत 55% (महात्मा गांधी योजना), 30% ग्रामपंचायत 14 वित्त आयोग व 15% जिल्हा परिषद शेष मधून पूर्ण होत आहे. ही एक अभिनय योजना आहे, त्यामधून शाळेच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लागला असून, जिल्हा परिषद शाळा सुंदर व चांगल्या झाल्या पाहिजेत हे एकमेव उद्दिष्ट ठेवून व अशा कामांचा पाठपुरावा करून सर्वात जास्त निधी करवीर तालुक्यासाठी आपण आणला आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

         या कार्यक्रमावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक मेहत्तर सर यांनी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या कार्याबद्दल आभार मानले व अशाच पध्दतीचे भविष्यातील उपक्रम राबवावे असे सांगितले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यादव ताई, उपाध्यक्ष केशव माने, सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सदस्य व मान्यवर, शिवछावा कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, सोसायटी चेअरमन दादू पौंडकर, उपसरपंच भारती माने, शंकर कुशीरकर, संगीता दुर्गुळे, सारिका सुतार, स्वाती माने आदी मान्यवर त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर शहरातील मुख्य मटण मार्केट राहणार बंद, जिल्ह्यात इतरत्र सुरूच राहणार

Archana Banage

सॉलिड स्टेट न्यक्लिअर डिटेक्टर संशोधनाला पेटंट

Archana Banage

मुलाखत द्यायची कुठे, कधी आणि केंव्हा ?

Archana Banage

बैलगाडी असोसिएशनच्या पुनर्स्थापनेसाठी एकवटले गाडीवान

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : धामोडात युनियन बँकेत चोरीचा प्रयत्न

Archana Banage

अंबाबाईच्या मंदिरात चोरटे मोकाट

Archana Banage