Tarun Bharat

खंडणीच्या गुह्यातील एक वनकर्मचारी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी/ नागठाणे

पिरेवाडी (ता.सातारा) येथील युवकाला शिकारीच्या खोटय़ा गुह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या चार वनकर्मचार्यांपैकी एकाला बोरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले. महेश साहेबराव सोनवले (वय.28,रा.घोट,ता.पाटण) असे या वनकर्मचाऱयाचे नाव आहे. गुरुवारी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील वनपालासह अन्य दोन वनसंरक्षक अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱयांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. याची तक्रार ओंकार शिंदे याने 5 सप्टेंबरमध्ये बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित, वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले, रणजित व्यंकटराव काकडे, किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते. 

याचदरम्यान त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता तर उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळणार हे लक्षात येताच संशयितांनी अर्ज मागे काढून घेतला होता. अखेर बुधवारी सायंकाळी वनसंरक्षक महेश सोनवले याला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Stories

कोरोनाच्या विळख्यातून जिल्ह्याला सावरणार कसे?

datta jadhav

महा‘टुचुक’मध्ये जिल्हय़ात उच्चांकी लसीकरण

Patil_p

बारामतीत राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यावर गोळीबार

Amit Kulkarni

पाच वर्षांच्या बालकावर बिबट्याचा हल्ला

Patil_p

सातारा जिल्ह्यात 38 बाधित , 2 बळी

Archana Banage

ठक्कर सिटी समोर चाक निसटलेल्या बसने चौघांना ठोकरले

Patil_p