Tarun Bharat

खंडणी प्रकरणातील ‘त्या’ दोघांना जामीन


वार्ताहर / मौजेदापोली

तालुक्यातील टेटवली येथील कात कारखान्याच्या मालकाकडून दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी एक महिला व पुरूष अशा दोघांना ताब्यात घेतले होते. त्या दोघांना खेड न्यायालयात जामीन मंजूर झाला असल्याचे तपासिक अंमलदार मंदार हळदे यांनी सांगितले.

टेटवली येथे विशाल मालवणकर यांच्या पत्नीची काताची कंपनी आहे. मालवणकर 2010 पासून मंडणगड येथील विजय काते यांच्याकडून कच्चा माल घेत होते. 2017 पासून त्यांनी काते यांच्याकडून कच्चा माल घेणे बंद केले. तेव्हापासून विजय हे विशाल यांना धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी करीत होते. या पकरणी विजय काते व स्वाती वावडेकर या दोघांना खंडणीचा गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले होते. त्यांना खेड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Related Stories

भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

datta jadhav

शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा होणार नाही : आरोग्य राज्यमंत्री

Archana Banage

ऊस तोडणी मजूर जाणार आपल्या गाव

Archana Banage

आता शिक्षक विद्यार्थ्यांना कोरोना बाबत उद्भोदक करणार

Patil_p

सातारा पोलिसांच्या जुगार अन् दारु अड्डय़ावर छापे

Patil_p

ऑनलाईन लेक्चर चा पाच हजार विद्यार्थी घेतायत लाभ

Archana Banage