Tarun Bharat

खंडणी मागितल्याप्रकरणी दोन पत्रकारासह तिघांवर गुन्हा

Advertisements

पंढरपूर / प्रतिनिधी

वीज वितरण कंपनीमधील सहायक अभियंत्यास बदनामी करणार्‍या बातम्या छापण्याची धमकी देवून खंडणी मागितल्या प्रकरणी दोन पत्रकारांसह एका सामाजिक कार्यकत्यांवर वीज वितरण कंपनीमधील सहायक अभियंता गणेश वगरे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा करकंब परिसरात घडला असून करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे.
वीज वितरण कंपनीत सहायक अभियंता पदावर गणेश वगरे यांनी काही दिवसापूर्वी एक चिठ्ठी लिहली होती. यामध्ये त्यांनी आपली विनाकारण बदनामी केली जात असून पैश्याची मागणी होत असल्याने या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून पत्नी व दोन मुलींसह आत्महत्या करीत असल्याचे पत्र लिहले होते. यानंतर मोबाईल बंद करून ते बेपत्ता होते. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्यांचा कसून तपास केला असता त्यांचे कुटुंबिय कर्नाटकातील एका गावात आढळून आले. वगरे कुटुंबियांना पोलिसांनी पंढरपुरात आणून त्यांचे समुपदेशन केले. 

यानंतर गणेश वगरे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील एका संघटनेचा सामाजिक कार्यकर्ता नामदेव विश्‍वनाथ खेडेकर याच्यासह पंढरपूर येथील पत्रकार महालिंग दुधाळे व तालुक्यातील भोसे येथील अविनाश उर्फ बंडू साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वगरे यांच्याकडे भोसे येथील वीज वितरण कार्यालयाचा अतिरीक्त भार आहे. पटवर्धन कुरोली येथील खेडेकर याने घराचे वीज बिल न भरल्यामुळे त्याचे कनेक्शन घोडके याने तोडले होते व याबाबत वगरे यांनी त्यास मदत केली नव्हती. याचा राग मनात धरून नामदेव खेडेकर यांनी वगरे व त्यांचा सहायक राजेंद्र घोडके यांच्या विरोधात कोट्यवधीचा घोटाळा केल्याची तक्रार केली होती. सदर तक्रारीची समिती नेमून खातेनिहाय चौकशी होवून तक्रारीत तथ्य नसल्याचा शेरा देण्यात आला होता. 

मात्र सदर तक्रारीच्या आधारे दुधाळे व साळुंखे यांनी दैनिकांमध्ये बातम्या छापल्या. तसेच तुमच्या विरोधात आणखी बातम्या छापणार असल्याची धमकी देत होते. याबाबत तडजोड करायची असेल तर आम्हाला भेटा असा निरोप देत होते मोबाईलवरील हे मेसेज माझ्याकडे असल्याचा दावा वगरे यांनी केला आहे. तसेच तुमच्या बद्दल आणखी तक्रारी असून त्याच्या बातम्या छापण्याची धमकी देत वारंवार पैश्याची मागणी करीत असत. तडजोड करा अन्यथा बदनामीकारण बातम्या छापू असा दम देणे व खंडणी मागणे असा प्रकार घडल्याचे वगरे यांनी पोलिसात सांगितले आहे.

Related Stories

अनेक वर्ष सत्तेत असलेल्यांकडूनच दिशाभूल; शेतकऱ्यांनो सावध राहा : नरेंद्र मोदी

Rohan_P

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

datta jadhav

‘त्या’ ड्रग्स पार्टीत भाजपच्या कोणत्या नेत्याच्या मेव्हणा?, नवाब मलिक उद्या पोलखोल करणार

Abhijeet Shinde

”योगी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे जनतेवर संकटांचा डोंगर”

Abhijeet Shinde

VIP चे मुकेश साहनी यांना मोठा धक्का

Abhijeet Shinde

चीनच्या Weibo, Baidu Search अ‍ॅपवरही भारताने घातली बंदी

datta jadhav
error: Content is protected !!