Tarun Bharat

खंडाळा पोलिसांकडून चोरट्यांची टोळी जेरबंद

खंडाळा / प्रतिनिधी : 

विहिरीतील मोटर आणि दुचाकी चोरी करणारी 6 जणांची टोळी जेरबंद करण्यात खंडाळा पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून 3 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

मागील काही महिन्यांपासून खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विहीरीतील मोटर आणि दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. त्यावर जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांच्या सुचनेनुसार आणि पोलीस निरिक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. 

खंडाळय़ातील अंमलदारांच्या या पथकास खंडाळा, लोणंद, सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुह्यांमधील सहा जणांची टोळी पकडण्यात यश आले. या संशयित चोरटय़ांकडून विहीरीतील दोन मोटर आणि सात दुचाकी असा एकूण 3 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Related Stories

डॉ. विजय थोरात आज स्वीकारणार पदभार

Patil_p

‘त्या’ मालिकेचे चित्रीकरण सुरुच राहणार

Patil_p

सातारा : डोंगर माथ्यावरील साद्याभोळ्या जनतेला राजकीय अश्वासने देऊन भुलवण्याचा प्रकार

Archana Banage

Satara : बोरगाव पोलिसांच्या पथकावर हरपळवाडीत जमावाचा भीषण हल्ला

Abhijeet Khandekar

खासदार उदयनराजे यांनी शूरवीरांना केले अभिवादन

Archana Banage

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, ३ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई

Archana Banage