Tarun Bharat

खंडोबा तालमीचे माजी अध्यक्ष सुरेश जरग यांचे निधन

धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांची चटका लावणारी एक्झीट

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीचे माजी अध्यक्ष, शिवाजी तरुण मंडळाचे सहसचिव आणि शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते सुरेश बापुसा जरग (वय 68, रा. साने गुरूजी वसाहत) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपमहापौर विक्रम जरग यांचे ते बंधू होत.

जरग यांना 24 फेब्रुवारीला स्वादूपिंडाचा त्रास होऊ लागल्याने खासगी रूग्णालयात दाखल केले होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना डिस्चार्जही मिळाला होता. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रात्री साडेआठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. रक्षाविसर्जन बुधवारी (दि. 23) सकाळी 9 वाजता आहे. तर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता शिवाजी तरुण मंडळाच्या शिवाजी मंदिरमध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.

जरग यांनी खंडोबा तालीम, शिवाजी तरुण मंडळ या बडय़ा तालीम संस्थांबरोबर शिवसेना, भाजप या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. फेरीवाले संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. जोतिबा रोड, महाव्दार रोड, ताराबाई रोडवरील फेरीवाल्यांसह फुल विक्रेत्यांच्याही आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असे. टोल विरोधी आंदोलनासह सर्व पक्षीय कृती समितीच्या विविध आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.

शिवजयंती आणि जरग हे समिकरण
शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवात सुरेश जरग दरवर्षी उत्साहाने सहभागी होत. वर्गणी संकलनापासून मिरवणुकीच्या तयारीतील प्रत्येक जबाबदारी ते आपलेपणाने पुढाकार घेऊन पार पाडत असत. मंडळची शिवजयंती मिरवणूक आणि सुरेश जरग जणू समिकरण बनले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांच्या संख्येवरून त्यांचे कार्य, साधेपणा आणि आपुलकीचे दर्शन घडले.

Related Stories

भीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवारांची तिसऱ्यांदा नोंदवली साक्ष

Archana Banage

व्वा! उद्योगपती आनंद महिंद्राना कोल्हापुरच्या फोटोने घातली भुरळ, हा फोटो केला ट्विट

Archana Banage

कोल्हापूर : हुपरीच्या चांदी उद्योजकाची स्‍वत: वर गोळी झाडून आत्‍महत्‍या

Archana Banage

कोल्हापूर : ऑक्सिजनची ६० टक्के निर्मिती जिल्हयातच

Archana Banage

मोटरसायकल चोरट्यास पोलिसांनी केले अटक

Archana Banage

उत्तराखंडमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 2800 वर

Tousif Mujawar
error: Content is protected !!