Tarun Bharat

खंबाटकी घाटात दोन कंटेनरला आग

आगीत दोन कोटींचे नुकसान, वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा

प्रतिनिधी/ खंडाळा

खंबाटकी घाटात रविवारी दुपारी 1 वाजता कंटेनरचा ब्रेक फेल होऊन तो उताराने पाठीमागे असलेल्या कंटेनरवर आदळला. यावेळी कंटेनरच्या डिझेल टाकीला आग लागून त्या वाहनांनी पेट घेतला. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. त्यामध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे असल्याचे सागण्यात आले. साताऱयाकडे जाणारी वाहने बोगदा मार्गे वळवण्यात आल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. महामार्गावर धिम्या गतीने वाहतूक सुरू होती. याचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागत होता. दरम्यान, चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असून त्यानंतर वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलीस व वाहतूक विभाग रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होते.

  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आशियाई महामार्गावर असणाऱया खांबाटकी घाटातून कापड अणि MG हेक्टर कंपनीच्या गाडय़ा घेऊन दोन्ही कंटेनर साताऱयाच्या दिशेनी निघाले होते. दरम्यान, दत्त मंदिराजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुजरातहून सातारच्या दिशेने कपडे घेऊन जाणारा कंटेनर क्र. जी. जे. 27 एक्स- 6199 चा ब्रेक फेल झाला. दत्त मंदिराजवळील वळणावर ट्रक मागे येऊ लागला. यावेळी पाठीमागुन MG हेक्टर कंपनीच्या चारचाकी सहा गाडय़ा घेऊन निघालेल्या कंटेनरवर येऊन धडकला. त्यावेळी डिझेल टाकी फुटल्याने केबीन व दुसऱया कंटेनरच्या पाठीमागील बाजुने पेट घेतला. आग वाढत गेल्याने वाहने जळाली. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस हवालदार विजय पिसाळ, गणेश सणस, प्रकाश फरांदे, जिल्हा वाहतूक शाखा, तसेच महामार्ग पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाई पालिका, एशियन पेंट कंपनी, किसनवीर कारखान्याचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले होते. जवळपास तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. तर या घटनेत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

खंबाटकी घाटात लांबलचक रांगा

रविवारी सुट्टय़ा असल्यामुळे अगोदरच महामार्गावर वाहनांच गर्दी होती. त्यातच खंबाटकी घाटात झालेल्या अपघातामुळे घाट रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. साताऱयाकडे जाणारी वाहतूक बोगदा मार्गे वळवण्यात आल्याने खंबाटकीत सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने खंबाटकीत वाहन चालकांसह प्रवाशांना ताटकळावे लागले. तर सुट्टी संपवून पुन्हा मुंबई, पुण्याच्या दिशेने प्रवाशी परतल्यामुळे धिम्यागतीने सुरु असणारी वाहतूक रात्री उशिरा सुरळीत झाली असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

राष्ट्रवादीकडून भाजपला मदत; लवकरच परिणाम दिसतील; पटोलेकडून सूचक विधान

Rahul Gadkar

फलटणमध्ये होणार शंभर बेड्सची उभारणी

datta jadhav

साताऱ्यात ऑक्सिजनही उदयनराजे यांच्यामुळे येतो

datta jadhav

सातारा पालिकेचे 307 कोटींचे बजेट मंजूर

datta jadhav

सातारा जिल्हय़ात रुग्ण आणि मृत्यूदर घटेनाच

Archana Banage

दोन पथके रवाना तरी ‘बाळु’ सापडेना

Patil_p