Tarun Bharat

खटावचे जवान अजिंक्य राऊत यांचे निधन

वार्ताहर / खटाव

खटाव येथील जवान अजिंक्य किसन राऊत (वय 27) यांचे हैदराबाद (सिकंदराबाद) येथे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच खटाव मध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. खटाव मधून ’अमर रहे’ च्या घोषणा देत पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा वीर जवान अजिंक्य राऊत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

  अजिंक्य राऊत यांचे माध्यमीक शिक्षण श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल मध्ये तर  उच्च माध्यमिक शिक्षण शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथे झाले होते. सन 2014 मध्ये ते आर्मी मध्ये भरती झाले होते. अजिंक्य  राऊत यांनी विविध ठिकाणी सेवा बजावली होती. सध्या ते सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावत होते. तेथील आर्मी मेडिकल कोर मध्ये सक्रिय होते. सिकंदराबाद येथील हॉस्पिटल मध्ये कोरोना काळात दिड वर्ष झाले ते सेवा बजावत होते. दरम्यान 2018 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. कर्तव्य बजावत असतानाही त्यांची खटावशी नाळ घट्ट होती. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. येथील अंबाबाई क्रीडा मंडळाचे ते सक्रिय सदस्य होते. दुर्गा उत्सवात त्यांचा विशेष सहभाग असे.  

     काल अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर आर्मी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मिडियाद्वारे खटाव मध्ये वा-यासारखी पसरली. एक हसतमुख, सर्वांना मदत करणारा, सामाजिक कार्यात अग्रेसर असणाया जवानांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

      वीर जवान अजिंक्य राऊत चे वडील आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. तर भाऊ अक्षय एअरफोर्स मध्ये सेवा बजावत आहे.

     खटाव गावातून ’अमर रहे’ अशा घोषणा देत पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात साश्रू पूर्ण नयनांनी वीर जवान अजिंक्य राऊत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजिंक्य राऊत यांना मानवंदना देण्यात आली. 

Related Stories

दरोडय़ाच्या गुन्हय़ातील सराईत गुन्हेगार जेरबंद

Patil_p

कराडला व्हॅक्सीन ऑन व्हील सेवेचा शुभारंभ

Patil_p

सातारा : दुचाकी व बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन अल्पवयीन युवकासह भंगार विक्रेत्यास अटक

Archana Banage

दुचाकीवरून बेळगावला निगालेले बांधकाम मजूर ताब्यात

Archana Banage

कण्हेरमध्ये झाले आतापर्यत 54 बाधित

Patil_p

शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न

datta jadhav