Tarun Bharat

खटाव तालुक्यात पुन्हा दौडल्या बैलगाड्या; 7 जणांवर गुन्हा

मायणी : धोंडेवाडी गावच्या शिवारात पुन्हा बैलगाड्या शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी मायणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे .

या संदर्भात मायणी पोलीस दुरक्षेत्राकडून मिळालेली माहिती अशी, धोंडेवाडी ता. खटाव गावच्या हद्दीत अनफळे गावच्या लगत असलेल्या रायगुडे मळा नावाच्या शिवारात बेकायदा बिगर परवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती सपोनि मालोजी देशमुख यांना मिळाली. त्यानुसार मायणी पोलिसांनी सदर ठिकाणची पाहणी केली असता बैलगाडा शर्यती चालू असल्याचे निदर्शनास आले. बैलगाडा चालकांना पोलिसांची चाहूल लागताच तेथील बैलगाड्या यांचे मालक व चालक आपापल्या बैलगाड्या घेऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी चार बैल व सात इसमांना ताब्यात घेतले. सदर 7 इसमांसह व चार बैल व एक छकडा गाडी असे ताब्यात घेऊन मायणी पोलीस दूरक्षेत्र येथे हजर केले. सदर ठिकाणी बैलगाडी शर्यतीसाठी एकत्र जमा करून मा. जिल्हाधिकारी ,सातारा यांचे जमावबंदी आदेश उल्लंघन केले आहे, म्हणून त्यांचे विरुद्ध भादवि कलम 188 269 आणि प्राणी संरक्षण अधिनियम 1960 चे कलम 11 (1)(1 )महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1 ) (3 ) 135 आपत्ती व्यवस्थापन 2005 चे कलम 51 (ब) व महाराष्ट्र पूर्वी अधिसूचना 2020 चा नियम 11 प्रमाणे फिर्याद करण्यात आली आहे.

Related Stories

राष्ट्रध्वजाच्या विक्रीमुळे पालिकेच्या तिजोरीत वाढ

Patil_p

कराडजवळ 22 प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली

Kalyani Amanagi

कळंबेत रिक्षाने ठोकरल्याने चिमुकलीचा मृत्यू

Patil_p

सातारा : कारखानदारी बंद ठेवा, अन्यथा सामुहिक आत्मदहन

Archana Banage

सातारा शहरात ‘मासिक पाळी’ खोलीची गरज

datta jadhav

शिवाजी विद्यापीठ देणार प्रवेश शुल्कात 20 टक्के सवलत

Archana Banage
error: Content is protected !!