Tarun Bharat

खटाव-माण साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना दिलासा

दिघंची / वार्ताहर


खटाव-माण साखर कारखान्याने 15 डिसेंबर अखेरपर्यंतच्या ऊस बिलाचा प्रथम हप्ता 2400 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असल्याचे मत पुजारवाडी (दि) चे ब्रह्मदेव होनमाने यांनी व्यक्त केले.

ब्रह्मदेव होनमाने यांनी सांगितले की कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, व्हाईस चेअरमन मनोज घोरपडे तसेच कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव माण तालुका साखर कारखान्याने शेतकऱ्यांना यंदा ऊसाला चांगला दर दिला आहे.

आतापर्यंत कारखान्याने एक लाख 35 हजार मेट्रिक टन एवढे विक्रमी उसाचे गाळप केले आहे. तसेच मोळी पूजनावेळी शेतकऱ्यांना 2400 रुपयेचा पहिला हपता देऊ, हा दिलेला शब्द कारखाना प्रशासनाने पाळला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2400 रुपये प्रमाणे पहिला हपता जमा झाला असल्याचे होनमाने यांनी सांगितले. तसेच उर्वरित रक्कम जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले आहे.

Related Stories

कोल्हापूरसह `या’ जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना लागू

Archana Banage

सोलापूर शहरात १७ नवे कोरोना रुग्ण ; एकाचा मृत्यू

Archana Banage

पुणे : मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची पहिली पेटी दाखल

prashant_c

सोलापूर : कोरोना उपचार ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तालुका नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती

Archana Banage

निधीअभावी शहरातील प्रकल्प रखडणार नाहीत

Archana Banage

सोलापूर: नई जिंदगी परिसरात खून

Archana Banage
error: Content is protected !!