Tarun Bharat

खटाव येथील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Advertisements

वार्ताहर/ पुसेगाव

बहिणीला आणायला जाताना खटाव एसटी बस स्थानका जवळ दुचाकीवर उभे असताना ’ आम्हाला बघून गाडीचा हॉर्न का वाजवलास ’  म्हणून दुचाकी जवळ येत तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली या बाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात खटाव येथील तीन जणां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

खटाव येथील एस टी स्टँड जवळील वडापाव सेंटर येथे ही घटना घडली. अक्षय दिलीप पाटोळे,किशोर दिलीप पाटोळे व विजय रघुनाथ फडतरे या तिघा विरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

       फिर्यादी प्रशांत नंदकुमार घाडगे यांच्या तक्रारीनुसार

वरील तिघांनी विनाकारण मला मारहाण केली आहे. मी माझ्या बहिणीला आणण्यासाठी खटाव येथील एस टी स्टँड वर दुचाकीवर उभा होतो त्यावेळी अक्षय दिलीप पाटोळे,,किशोर दिलीप पाटोळे व विजय रघनाथ फडतरे यांनी गाडी जवळ येऊन आम्हाला बघून तू गाडीचा हॉर्न का वाजवला,असे म्हणत दमदाटी केली. त्यातील अक्षय याने शेजारील वडापावच्या गाडय़ावरील किटलीने मारहाण करण्यास सुरूवात केली,तर किशोर याने जवळच पडलेले खोरे घेऊन डाव्या हाताच्या मनगटाजवळ मारले ,विजय फडतरे याने वडापावच्या गाडय़ावरची झारी माझ्या कपाळावर मारल्याने डोक्यात दोन टाके पडले आहेत तसेच डाव्या हातास फ्याक्चर झाले असल्या बाबत ची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याचे पी एस आय बी बी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले अधिक तपास करत आहेत.

Related Stories

शिवरायांचा इतिहास गीत ध्वनीमुद्रणातून समाजापुढे यावा : खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

चतुर्थ वार्षिक पाहणीसाठी 30 पथके तैनात

Patil_p

”संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ”

Abhijeet Shinde

यंदाचा नोव्हेंबर १४२ वर्षांच्या इतिहासात चौथा सर्वाधिक उष्ण महिना

Sumit Tambekar

कृष्णा खोरेने अतिक्रमणावर फिरवला बुलडोझर

datta jadhav
error: Content is protected !!