Tarun Bharat

खडकलाट परिसरात वटपौर्णिमा साजरी

खरेदीसाठी कॅम्प परिसरात खवय्यांची होतेय गर्दी

प्रतिनिधी / बेळगाव

पावसाला सुरुवात झाली की खवय्यांना आठवण होते ती खेकडय़ाच्या झणझणीत रश्श्याची आणि मसाला खेकडय़ांची. मागील आठवडय़ात जिल्हय़ात झालेल्या पावसानंतर शहरामध्ये खेकडय़ांची आवक वाढली आहे. शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात खेकडे बाजारात दाखल झाल्याने खरेदीसाठीही खवय्यांची गर्दी उसळली होती.

पावसाळी काळय़ा खेकडय़ांना विशेष मागणी आहे. पावसाला सुरुवात होताच बेळगाव परिसरात असणाऱया नद्या, तलाव, धरणांच्या काठांवर खेकडे उपलब्ध होतात. खेकडय़ांची आवक वाढते. बेळगावमधील कॅम्प येथील फिश मार्केटसमोर आणि खासबाग बसवेश्वर सर्कल येथेही काही प्रमाणात खेकडय़ांची विक्री केली जाते. पहिल्या पावसानंतर खेकडे खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी होत असते.

खेकडय़ांचे दर

बेळगाव बाजारात येणारे खेकडे हिडकल जलाशय तसेच घटप्रभा नदीकाठ परिसरातून येतात. दिवसभर खेकडे विक्री करून हे लोक संध्याकाळच्या बसने पुन्हा गावी परततात. आकाराप्रमाणे खेकडय़ांचे दर आकारले जातात. मोठे खेकडे 100 रुपयाला 3 तर लहान खेकडे 100 रुपयांना 5 ते 10 याप्रमाणे विक्री केले जात होते.

Related Stories

मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्याची मागणी

Amit Kulkarni

खैरवाड दुर्गादेवी यात्रोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

उत्पन्न वाढीसाठी व्यापारी संकुल उभारणार

Amit Kulkarni

शहाबंदरजवळ सव्वालाखाची गावठी दारू जप्त

Patil_p

खादरवाडी विनायक नगरात साकारलेला तोरणा गड

Patil_p

काजु फेणीच्या बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

Patil_p