Tarun Bharat

खडकात सापडले औषधी मीठ

हिमाचल प्रदेशातील मंडी येथील द्रंग पर्वतरांगा या हिमालयाचाच एक भाग मानल्या जातात. या पर्वतावर विशिष्ट प्रकारचा खडक सापडतो. या खडकात क्षारांचे प्रमाण मोठे आहे. या खडकातील क्षारांना म्हणजेच मिठाला. विशिष्ट प्रकारची चव असून त्याचे औषधी गुणधर्मही सिद्ध झालेले आहे.

या क्षारयुक्त खडकांचा शोध नुकताच लागला आहे. पूर्वीपासून येथे वास्तव्य करणाऱया वनवासी समुदायांना याची काही प्रमाणात माहिती होती. तथापि ती माहिती त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिली. नंतरच्या काळात संशोधकांनी या खडकांवर अधिक संशोधन केले. अभ्यासाअंती या खडकातील मीठ वेगळय़ाच प्रकारचे असल्याचे दिसून आले. तसेच त्याची चव अन्य कोणत्याही मीठापेक्षा वेगळी असल्याचेही आढळले. आता या मीठाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन केले जाणार आहे. यासाठी हिंदुस्थान सॉल्ट्स लिमिटेड या कंपनीने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता हे अनोखे मीठ साऱया देशात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान सॉल्टस् लिमिटेड या कंपनीला केंद्र सरकारने द्रंग पर्वतरांगामध्ये 133 एकर जमीन भाडेतत्त्वावर दिली आहे. येथे हे उत्पादन होणार आहे.

Related Stories

ललित मोदींनी मुलाला बनवले उत्तराधिकारी

Patil_p

दहा महिन्यांनंतर सिद्धू तुरुगाबाहेर

Patil_p

असा असावा निर्धार

Patil_p

गुजरातमधील 3 कंपन्यांशी ‘भारत बायोटेक’चा करार

Patil_p

मोहाली, लुधियाना आणि जालंधरमध्ये होणार चार नवीन कोविड टेस्टिंग लॅब

Tousif Mujawar

चिनी सैन्याकडून ‘गलवान’सारख्या अस्त्रांची पुन्हा खरेदी

Patil_p
error: Content is protected !!