Tarun Bharat

“खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका”

जळगाव/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांमधला वाद चव्हाट्यावर येत आहे. आता जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (rashtrawadi congress) आणि शिवसेना (Shivsena) वाद उफाळून आलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (former minister eknath khadse) आणि मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (mla chandrakant patil) यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाका, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. एका व्हायरल क्लिपवरुन एकनाथ खडसे यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. ऑडिओ क्लिपमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर टीका केल्यांनतर आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी व्हायरल ऑडिओ क्लिप बाबत एकनाथ खडसे हे माझं नाव जोडत आहेत. खडसेंनी ही क्लिप मतदार संघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावी. जेणेकरून कोणाची काय पात्राता आहे हे मतदारांना कळेल. मी आणि माझे कुटुंब अत्यंत साधेपणाने जगतोय. त्यामुळे खडसेंना असं वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना पाटील यांनी एकनाथ खडसे माझ्या संदर्भात पातळी सोडून बोलू नये, त्यांनी पातळी सोडल्यास मी देखील पातळी सोडून बोलेन, असा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला. मी त्यांचा कधीही अनादर केला नाही. त्यामुळे त्यांनी तोंडाला कुलूप लावावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Related Stories

हैदराबादसमोर पराभवाची श्रृंखला खंडित करण्याचे आव्हान

Patil_p

MPSC परीक्षा उत्तरतालिकांच्या हरकतींसाठी लागणार शुल्क

datta jadhav

नेपाळ उभारणार 89 बॉर्डर आउटपोस्ट

datta jadhav

साविआच्या पार्टी मिटींगला सत्ताधारी नगरसेवकांची दांडी

Patil_p

महावितरणच्या कंत्राटी कामगाराच्या पैशावर डल्ला

Patil_p

“पुण्यात महाविकास आघाडीचं एक काम दाखवा आणि ३० हजारांचं बक्षीस मिळवा”

Archana Banage