Tarun Bharat

खडेबाजारमध्ये दोन वर्षांपासून जलवाहिनीला गळती

पाणीपुरवठा मंडळाचा भोंगळ कारभार

प्रतिनिधी/ बेळगाव

एकीकडे ‘पाणी वाचवा’ हे अभियान चालविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे पाणीपुरवठा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे मागील दोन वर्षांपासून पाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे नागरिकांनी तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱया कर्मचारी व अधिकाऱयांवर कोणती कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.

खडेबाजार येथे दोन ते तीन ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी पाणी गळती सुरू आहे. पाण्याची गळती होऊन रस्ताही खराब होत आहे. रस्त्यात पाणी राहिल्याने जोरात वाहने जाताच ते येणाजाणाऱया नागरिकांच्या अंगावर उडत आहे. तसेच हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे रहिवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

खडेबाजार परिसरात एका ठिकाणची गळती काढण्यात आली परंतु उर्वरित दोन ते तीन ठिकाणी अद्याप पाण्याची गळती सुरू आहे. दोन वर्षांपासून पाणी वाया जात असले तरी, पाणीपुरवठा मंडळाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या भेंगळ कारभारामुळे असे प्रकार होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related Stories

मण्णूर ज्योतिर्लिंग मल्टीपर्पजची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Amit Kulkarni

कोगनोळी चेकपोस्टवर सेवा बजाविणाऱया पोलिसांवर कोरोनाचे सावट

Patil_p

बाळेकुंद्री खुर्द जनता विद्यालयाचे घवघवीत यश

Omkar B

विद्यार्थ्यांच्या स्वागताची शिक्षण खात्याकडून तयारी

Patil_p

गांभीर्य हरवले…मास्कचे अन् कोरोनाचेही!

Omkar B

वॉर्ड क्रमांक 56 मधील समस्या सोडवा रहिवाशांचे मनपा आयुक्तांना निवेदन

Omkar B