Tarun Bharat

खडेबाजार मार्ग सर्वाधिक महागडा

प्रति चौरस फुटाला निवासी जागेचा दर 9 हजार 720 रुपये तर कमर्शियल जागा पोहोचली 13 हजार 608 रुपयांवर

बेळगाव शहर झपाटय़ाने वाढते आहे. मध्यवर्ती शहराची गजबज ज्या प्रमाणात वाढतेय तितक्मयाच मोठय़ा प्रमाणात उपनगरी भागांचा विस्तारही वाढू लागला आहे. नुकतीच शहराची नोंद स्मार्ट सिटीत झाली. रस्त्यांची रुंदी वाढली आणि जुने डांबरी रस्ते जाऊन त्या ठिकाणी काँक्रिटचे रस्ते दाखल होऊ लागले. एकीकडे विकासाच्या नावाने बोंब असली तरी रियल इस्टेटमध्ये मात्र दरांचा उच्चांक शहरात वाढतो आहे. शहरातील मिळकतींच्या बाजारमूल्यांच्या दरात विक्रमी वाढ होऊ लागली आहे. या दरांचा आढावा घेता गगनाला भिडलेले आकडे पहायला मिळतात. सध्याच्या परिस्थितीत शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्वात महागडा रस्ता म्हणून खडेबाजार परिसर गणला जातोय. या पाठोपाठ किर्लोस्कर रोड आणि रामदेव गल्लीचा क्रमांक लागतो.

गंगाधर पाटील / बेळगाव

मुद्रांक व नोंदणी खात्याने शहरातील मिळकतींच्या सरकारी दरांचा तक्ता बनविला आहे. यावरून केवळ सरकारी दरांचा विचार करता खडेबाजारचा क्रमांक सर्वात अव्वल आहे. येथील निवासी मिळकतींची किंमत प्रति चौरस फुटाला 9 हजार 720 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. कमर्शियल अर्थात व्यावसायिक मिळकतींचा दर प्रति चौरस फुटाला 13 हजार 608 रुपये झाला आहे. सध्या खुली जागा मिळणेही दुरापास्त बनलेले असताना खचाखच भरलेल्या खडेबाजारमध्ये एखादी मिळकत खरेदी करायची झाल्यास तिचा दर वरीलप्रमाणे असणार आहे.

स्थावर मिळकत खरेदी-विक्रीच्या दस्तावेजांची नोंदणी करताना मुद्रांक व नोंदणी खाते विशिष्ट दराने शुल्क वसूल करते. ठराविक विभागातील मालमत्तेचे नेमके बाजारमूल्य किती? याचा अभ्यास केला जातो. याबद्दलचा विभागवार अहवाल तयार केला जातो. बाजारमूल्यांवर आधारित नोंदणी व मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्याने खरेदीदारांवरील आर्थिक बोजा अधिक वाढल्याचे दिसून येते. मात्र वाढीव दर आणि त्यावरील शुल्क यामुळे सरकारच्या महसूल खात्याचा खजिना दिवसेंदिवस जास्तच भरत असल्याचेही चित्र पहायला मिळते. विशेषतः अधिक बाजारमूल्य निश्चित झालेल्या मार्गावरील विपेत्यांना याचा चांगला फायदा मिळत असतो.

किर्लोस्कर रोड दुसऱया क्रमांकावर

बेळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात येणाऱया महत्त्वाच्या मार्गांवरील मिळकतींच्या बाजारमूल्यांवर आधारित सरकारी दर पाहता सध्या किर्लोस्कर रोड येथील मिळकती दुसऱया क्रमांकावर आहेत. या ठिकाणी निवासी कारणासाठीच्या मिळकतींचा दर 8 हजार 560 रुपये प्रति चौरस फूट तर व्यावसायिक मालमत्तांचा दर 11 हजार 984 पर्यंत पोहोचला आहे. या पाठोपाठ रामदेव गल्लीचा क्रमांक लागतो. येथील निवासी मालमत्तांचा दर 8 हजार 350 रुपये प्रति चौरस फूट झाला असून कमर्शियल मालमत्तेसाठी चौरस फुटाला 11 हजार 690 रुपये इतका दर मोजावा लागणार आहे.

शहरांतर्गत महत्त्वाच्या गल्ल्या, बाजारपेठा यांच्या बाजारमूल्यात मागील 20 वर्षांत बेसुमार वाढ झाली आहे.

Related Stories

अंगणवाडी कर्मचाऱयांवर अधिक कामाचा ताण नको

Amit Kulkarni

राजवाडा कंपाऊंड येथे विद्युत खांबावर आगीचा भडका

Amit Kulkarni

आत्मनिर्भरसाठी परस्परांना सहकार्य करा

Omkar B

सांबरा मराठी शाळा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Amit Kulkarni

सीबीटी व्यापारी संकुलातील गाळय़ांबाबत संभ्रम

Omkar B

बागलकोट जिल्हय़ात 6 जणांना बाधा

Patil_p
error: Content is protected !!