Tarun Bharat

”खतांची दरवाढ करत केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले”

Advertisements

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खत दरवाढीची घेतली गंभीर दखल


ऑनलाईन टीम / नवी मुंबई

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खतांच्या किंमतीत अवाच्या सव्वा वाढवून शेतकऱ्यांच्यावरील आर्थिक भार वाढविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थीक गणित कोलमडले आहे. वाढीव खतांच्या किंमतीवरून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी केंद्र सरकावर टीका केली , कोरोना संकट आल्याने शेतकरी होरपळून निघालेला आहे. यावेळी केलेली खत दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. असे शरद पवार यांनी हे पत्रं ट्विटही केलं आहे.

पवार यांनी याबाबत केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किंमतीत झालेली दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. कोरोना संकट घोंगावत असताना केंद्राने खतांची केलेली दरवाढ यामुळे शेती व्यवसाय संकटात येणार आहे. या निर्णयामुळे बाजार पुर्ण कोलमडला आहे. यातच पावसाळा येऊ घातल्याने हा निर्णाय शेतकऱ्यांवर थेट परिणाम करणार आहे.

सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ आणि यातच झालेल्या खतांच्या किंमतीत वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर केंद्रानं मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रात पवार यांनी केंद्राने घेतलेला खत दरवाढीचा निर्णय हा आपल्यासाठी धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. या निर्णयात आपण वैयक्तीक लक्ष घालत दरवाढ मागे घेतल्यास आपल्याला निश्चित आनंद होईल असे म्हटले आहे.

Related Stories

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद

Rohan_P

“ओमिक्रॉननंतरच नवा व्हेरिएंट ठरणार प्राणघातक”

Abhijeet Shinde

आयआयएससीने लस निर्मितीविषयी आरोग्य मंत्र्यांना दिली माहिती

Abhijeet Shinde

अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात ; बाबा रामदेव यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

भारतीय रेल्वेने रचला इतिहास!

Rohan_P

माजी विधानसभा अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

datta jadhav
error: Content is protected !!