Tarun Bharat

खते, बियाणे विक्री गैरप्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे तक्रारीचे आवाहन

सातारा/प्रतिनिधी

शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते योग्य भावात मिळणे गरजेचे आहे.तसे न झाल्यास आणि गैरप्रकार आढळल्यास तक्रार करावी ,असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. कृषी विभागातर्फे खते आणि बियाणे यांच्या योग्य किमतीची शासनमान्य यादी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की, शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीमध्ये खते व बी–बियाणे मिळणे आवश्यक आहे. मूळ किमतीपेक्षा चढ्या भावाने विक्री करणे अथवा साठा उपलब्ध असूनसुद्धा विक्रीस मनाई करणे, लिंकिंग करणे म्हणजेच ; नसलेल्या वस्तू विकत घेण्याची सक्ती करणे असे आढळून आल्यास आपली तक्रार सबंधित तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे नोंद करावी, असे भागवत यांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे लिंकवर तक्रारीची माहिती भरावी. जेणेकरून आपल्या तक्रारीबाबत कृषी विभागाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित शेतकऱ्याला देता येईल. तक्रारदारांचे नाव व नंबर गोपनीय ठेवण्यात येईल.

https://bit.ly/2Vh7PV या लिंक वर बी बियाणे आणि खते यांच्या शासनमान्य किमती जाहीर करण्यात आले आहेत. तसेच https://bit.ly/3euEWN5 या लिंक वर ऑनलाइन तक्रार नोंद करावी असे आवाहन देखील श्री भागवत यांनी केले .तालुकानिहाय तक्रार निवारण अधिकाऱ्यांची यादी https://bit.ly/2Z5o0GE या लिंक वर उपलब्ध आहे. असे देखील भागवत यांनी सांगितले . कृषी खात्याने याबाबत विशेष आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना रास्त भावाने खते बी-बियाणे मिळावीत असा जिल्हा परिषदेचा आटोकाट प्रयत्न आहे. त्यानुसार हे कळकळीचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

Related Stories

महिला कुस्तीगिरांच्या खुराकासाठी खा.कोल्हे धावले

Archana Banage

‘सीआरपीएफ’ मधून बडतर्फ केलेल्या महिलेची जवानासोबत हुज्जत ; प्रवेशद्वारावर दगदफेक

Archana Banage

‘रमजान ईद’ निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा!

Tousif Mujawar

मी सत्यच बोललो; संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम

Archana Banage

”मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी अन् सामान्य माणसा…”

Archana Banage

एसटी कर्मचारी संप: परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

Archana Banage