Tarun Bharat

खदयानंद मांद्रेकर यांचा प्रचाराला प्रारंभ

वार्ताहर /शिवोली

शिवोली मतदारसंघात इतर उमेदवार पैशांच्या बळावर निवडणुक लढवीत आहेत. लोकांना विकत घेण्याचे प्रकार चालू आहेत. पण आमच्या सोबत फिरणारे कार्यकर्ते स्वगुशीने माझ्या विजयासाठी आज प्रचारात भाग घेतला आहे, असे माजी मंत्री व भाजपाचे संभाव्य उमेदवार दयानंद मांदेकर यांनी ओशेल येथे सांगितले.

ओशेल या भागातून दयानंद मांद्रेकर यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत जि.पं. सदस्या सनीशा तोरसकर, निहारीका मांदेकर, भाजपा मंडळाध्यक्ष मोहन धारगळकर, सिंपल धारगळकर,   मार्ना-शिवोलीचे माजी सरपंच दिगंबर आगरवाडेकर, पुष्पा हरमलकर व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

मी भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षासाठी एकनिष्ठ राहिलो आहे. शिवोली मतदारसंघातून भाजपाची तिकीट आपल्यालाच मिळेल याबाबत शंका नाही. संभाव्य उमेदवारांकडून निवडणुकीसाठी भरपूर पैशांचा वापर केला जातो. एक मंत्री स्वतः पाकीटातून घरोघरी पैसे वाटप करीत आहे. जर मतदार आपल्यासोबत आहे तर पैसे वाटण्याची गरज काय असा आगळीक टोला श्री. मांद्रेकर यांनी हाणला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थति होते.

Related Stories

वाहतूक कार्यालये, ढाबे ‘स्कॅनर’खाली येणे गरजेचे

Omkar B

हडफडेत पाच लाखांचा गांजा जप्त

Amit Kulkarni

म्हादईसाठी 26 रोजी खांडेपार येथे कलश मिरवणूक

Patil_p

मडगाव पालिकेचा विसर्जनस्थळी दोन कचरापेटय़ा ठेवण्याचा निर्णय

Amit Kulkarni

सर्वांच्या नजरा निकालाकडे

Omkar B

थार जीप गाडी जाळल्याची तक्रार

Omkar B