Tarun Bharat

खनिज मालाच्या लिलावाला अल्प प्रतिसाद

प्रतिनिधी / पणजी

नुकत्याच झालेल्या खनिज मालाच्या ई-लिलावाला फार मोठा प्रतिसाद मिळू शकला नाही. ई-लिलावासाठी काढलेल्या खनिजमालापैकी केवळ 7 टक्केच खनिजमाल विकला गेला. 27 मे रोजी खनिज मालाच्या ईöलिलाव करण्यात आला होता.

खनिज व्यावसायाला उभारी देण्याचा प्रयत्न सरकार वेगवेगळ्या मार्गाने करीत आहे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने जोर लावला आहे तर दुसऱया बाजूने ई-लिलावाच्या माध्यमातून खनिज व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्याचा भाग म्हणून 27 मे रोजी 2.5 दशलक्ष टन खनिजमालाचा ई-लिलाव पुकारण्यात आला होता. मात्र यापैकी केवळ 1.7 लाख टन एवढाच खनिजमाल विकला गेला. पावसाळ्यात खनिजमालाची निर्यात होणे शक्य नसल्याने व्यावसायिकांनी या ई-लिलावाला मोठा प्रतिसाद दिला नाही.

ई-लिलाव केलेला खनिजमाल उचलण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे मागील सुमारे महिनाभर राज्यात खनिज वाहतूक सुरू होती, मात्र आता पावसाळा जवळ आल्याने खनिज वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यानंतर पावसाळा संपताच चतुर्थीनंतर खनिज वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

Related Stories

नोकऱयांच्या बाजारात तरुणांचे भवितव्य विक्रीस

Patil_p

‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ ला सुवर्णमयुर

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी केली बेघरांची चौकशी

Omkar B

कळंगूट येथे टँकरला ठोकरल्याने युवक जागीच ठार, एक गंभीर जखमी

Amit Kulkarni

राजकीय घटस्थापनेची गुरुवारी ‘डेडलाईन’!

Amit Kulkarni

30 दिवसात पेन्शन थकबाकी द्या मुरगाव नगपालिकेला आदेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!