Tarun Bharat

खबरदार ! अभयारण्यक्षेत्रात थर्टीफस्ट कराल तर……

Advertisements

राधानगरी प्रतिनिधी

यंदाचा थर्टीफस्ट डिसेंबर अभयारण्य क्षेत्रात साजरा करायचा प्लॅन असेल तर खबरदार! कारण अभयारण्य क्षेत्रात थर्टीफस्ट डिसेंबर साजरा करण्यास बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी,दाजीपूर अभयारण्यासह चंदगड,तिलारी या रिजर्व्ह क्षेत्रात पार्ट्या साजऱ्या करण्यास मनाई आहे. तर पर्यटकांसाठी राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजची बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अभयारण्य किंवा तलावाशेजारी पार्टी करण्याचा बेत असेल तुमच्यावर वनविभाग,वन्यजीव प्रशासनाची नजर असणार आहे.

सध्या नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तलावाच्या ठिकाणी किंवा जंगल परिसरात नियोजन करतात. मात्र आता अशा ठिकाणी साजरा करणार असेल तर प्रशासनाची तुमच्यावर नजर असणार आहे. कोल्हापूर वन्यजीव-वनविभाग प्रशासनाने त्यावर बंदी घातली आहे. अभयारण्य क्षेत्रात डॉल्बी लावणे, हुल्लडबाजी करणे, मद्य पिणे, पार्ट्या करणे, आरडाओरड करणे याला बंदी घातली असून असे आढळल्यास त्यांच्यावर वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान या पायबंद घालण्यासाठी राधानगरी अभयारण्य आणि दाजीपूर अभयारण्य हे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

कोल्हापूर : वन समितींच्या दोषींवर कारवाई करणार – आ. आबिटकर

Archana Banage

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 297.03 मि.मी.पावसाची नोंद

Archana Banage

पूरबाधितांनी नुकसान भरपाई बाबत संभ्रम बाळगू नये

Archana Banage

रयतच्या अध्यक्षपदी शरद पवार तर सचिवपदी प्रा. डॉ. विठ्ठलराव शिवणकर

Archana Banage

पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, तर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला ‘हा’ पर्याय

Archana Banage

KYC च्या नावाखाली निवृत्त महिला प्राध्यापकास 20 लाखांचा गंडा

datta jadhav
error: Content is protected !!