Tarun Bharat

खराब हवामानामध्येही विमाने करता येणार लँड

प्रतिनिधी/ बेळगाव

खराब किंवा ढगाळ वातावरण असले की विमाने उतरविताना अनेक समस्या येतात. या दूर करण्यासाठी बेळगाव विमानतळावर इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टम (आयएलएस) ही रेडिओ सिग्नलवर आधारलेली यंत्रणा बसविली जात आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यापुढील काळात खराब वातावरणातही विमान धावपट्टीवर उतरविणे सोयीचे होणार आहे.

बेळगावमध्ये आयएलएसचे काम सुरू असून, यासाठी नवी दिल्ली येथील कार्पोरेट हेडक्वॉटर आणि एएआयचे विशेष पथक काम करीत आहे. उडान 3 मुळे बेळगाव विमानतळाचा विकास झपाटय़ाने झाला असून, प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानांची ये-जा देखील वाढली आहे. बऱयाचवेळा खराब वातावरणामुळे इतरत्र विमाने उतरवावी लागतात.

आयएलएस यंत्रणेमध्ये दोन ऍन्टीना असतात. विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरावे यासाठी ही यंत्रणा रेडिओ सिग्नलद्वारे संदेश विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेल्या रिसिव्हरमध्ये पाठवतात. खराब हवामानामध्ये देखील वैमानिकाला योग्य संदेश मिळणे सोयीस्कर होते. लवकरच ही यंत्रणा बेळगावमध्ये कार्यरत होणार असल्याचे विमानतळ अधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

‘त्या’ जोडगोळीची हिंडलगा कारागृहात रवानगी

Patil_p

पहिल्या रेल्वेगेटनजीकच्या दुभाजकाचा वाहनधारकांना फटका

Amit Kulkarni

म. ए. समिती-शिवसेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांना जामीन

Patil_p

काकामुळे पुतण्याला कोरोनाची लागण

Patil_p

कारवार जिल्हय़ातील तलावांचा विकास करा

Amit Kulkarni

वॉर्ड क्र. 27 मधील गटारी, नाले सफाईबाबत सूचना

Amit Kulkarni