Tarun Bharat

”खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”


मुंबई \ ऑनलाईन टीम

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत असा आरोप केला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आज ED ची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत.


सिल्व्हर ओक हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याचं नाव आहे. तर वर्षा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्याचं नाव आहे. त्यामुळे भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच आरोप केले आहेत.

Related Stories

आरटीओ कार्यालयाची वीज तोडली; कामकाज ठप्प

Patil_p

चंदगडी नाट्य़ महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Archana Banage

कातरखटावमध्ये भरदिवसा जबरी चोरी

Patil_p

94 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 8,535 नवीन कोरोना रुग्ण; 156 मृत्यू

Tousif Mujawar

संभाजीराजेंची दुर्गराज रायगडला भेट

Archana Banage