Tarun Bharat

खाकीची मानसिकता ढळतेय…!

प्रतिनिधी/ सातारा

जिह्यात कोरोना बाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यातच प्रशासनाने परजिह्यात असणाया नागरिकांना परवाने देऊन घरी जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे तर जिह्याच्या विविध भागात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र बाधित क्षेत्रात बंदोबस्तावर काम करत असणाया पोलीस कर्मचायांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या धास्तीने त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती बदलण्याच्या मार्गावर असून पोलीस दादांवरील कामाचा ताण  वाढत आहे. खाकीचीच मानसिकता ढळू लागल्याने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बंदोबस्तावरील कर्मचायांना गुह्यांच्या तपासासाठी वरिष्ठांकडून तगादा लावला जात असल्याने त्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे.

पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीत आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी कायमच उभे असते. सध्या जगासह देशावर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट गडद होत चालले आहे. सातारा जिह्याचा कोरोना बाधितांचा आकडा द्विशतकाकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस प्रशासनही शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, कोरोनाचा धोका या दोन्ही यंत्रणांना असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. आज पोलीस कर्मचायांना कोरोनाची लागण झाल्याचा आकडा वाढत आहे तर काही कर्तव्यदक्ष अधिकायांचाही कोरोनाने जीव घेतला आहे. सरकारने नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानी देऊन प्रवासासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईसह अन्य प्रांतातून लोकांचे लोंढे जिह्यात येऊ लागले आहेत. या सर्वाचा ताण पोलिस कर्मचायांवर वाढला असून त्यांची शारीरिक व मानसिक अवस्था बदलण्याचे मार्गावर आहे.

बाधित गावाला पोलीस बंदोबस्त दिला जात आहे. त्यामुळे बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी कोरोनासंसर्गाच्या भीतीच्या छायेत आहेत. बाहेरून येणा-या जाणायांची त्यांना नोंद ठेवावी लागत असून त्या नोंदीसाठी आलेल्या प्रवाशांशी संपर्क येत असल्याने व पुढील प्रवासी बाधित आहे की नाही याची कोणतीही कल्पना नसल्याने पोलीस कर्मचायांना धोका निर्माण होत आहे. त्यासाठी अद्यावत सुरक्षा यंत्रणा बंदोबस्तावर काम करणाया पोलीस कर्मचायांना पुरवणे गरजेचे आहे. 

निगेटीव्हीटी वाढू लागली, कुटुंबीय धास्तावले

नुकताच मुंबईत अमोल कुलकर्णी या कर्तव्यदक्ष अधिकायाचा कोरोनाने बळी घेतला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कामाचा ताण आणि पुरेसा आराम नसल्याने पोलीस कर्मचायांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाहीये. त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती बिघडून आरोग्याला धोका निर्माण होत आहे. काही कर्मचायांना उच्च रक्तदाब मधुमेह यांसारखे आजार असल्याने त्यांचा धोका वाढतच आहे. शिवाय कामाचा ताण लक्षात घेता पोलीस कर्मचायांची कुटुंबीय काळजीत पडले असून तेही कोरोनाने धास्तावलेल्या आहेत.

बंदोबस्तही गुह्यांचा ताण

बहुतांशी पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तावर असून त्यांच्याकडे गुह्यांच्या तपासासाठी ही तगादा लावला जात आहे. दिवस-रात्र बंदोबस्त करून गुह्यांच्या तपासासाठी पुरेसा वेळ कर्मचायांनामिळत नसल्याने तपासाचे काम रेंगाळत आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठांनी गुह्यांसाठी कर्मचायांना धारेवर न धरता त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी होऊन त्यांचे आरोग्यही सुस्थितीत राहणार आहे.

आम्हीपण माणसंच आहे ना 

कोरोना संसर्गाच्या भीतीने प्रत्येक जण घरी बसला आहे. मात्र आरोग्य व पोलिस यंत्रणा तसेच प्रशासन रस्त्यावर उभे आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाचा धोका यांना जास्त प्रमाणात आहे. पोलीस कर्मचायांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी काम करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आम्हीपण माणसेच आहोत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

खात्यांतर्गत पी एस आय 2016 मधील उमेदवारांना त्वरित सामावून घ्या

Archana Banage

महाराष्ट्रातील कोरोना : मागील 24 तासात 159 मृत्यू; 5,108 नवे रुग्ण

Tousif Mujawar

पूरस्थितीवर मात करण्यासाठी युतीचं सरकार कामाला लागलं; शंभूराजे देसाई

Abhijeet Khandekar

मिसेस फडणवीसांच्या ‘त्या’ ट्वीटवर रूपाली चाकणकर म्हणतात, जंगल की शेरनी शिकार करती है और सर्कस की शेरनी सिर्फ…

Archana Banage

कोल्हापूर : घरावर पिंपळाचे झाड पडल्याने 5 जण जखमी

Archana Banage

सत्ता आल्यास मराठा समाजाला आरक्षण – चंद्रकांत पाटील

Archana Banage