Tarun Bharat

खाजगी सावकारीतून मित्रालाच ठार मारण्याची धमकी

मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव याच्यावर गुन्हा नोंद

प्रतिनिधी / कोल्हापूर

खाजगी सावकारीतून व्याजाने घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या मोबदल्यात प्रवीण बाळकृष्‍ण पाटील (वय ४८, रा.संकल्प बी-१ शेवंतीपार्क, बळवंत नगर जवळ पाचगाव , ता.करवीर) यांच्याकडून व्याजासह १० लाख रुपये व दोन फायनान्स कंपनीच्या खात्यावर १० लाख रुपये भरावयास लावूनही आणखी ४ लाखांची मागणी केल्याप्रकरणी, तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव याच्याविरोधात राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीसांनी सांगितले की, प्रविण बाळकृष्ण पाटील हे शेअर मार्केट ब्रोकरचा मिरजकर तिकटी येथे व्यवसाय करतात. ते पत्नी, मुलगा व मुलीसह पांचगाव येथे राहतात. मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजु जयसिंग जाधव (रा रामगल्ली, मंगळवार पेठ,कोल्हापुर) याच्याशी त्यांची मैत्री आहे. त्यांनी शेअर मार्केटच्या व्यवसायाकरिता राजू जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या मोबदल्यात प्रवीण पाटील यांनी खाजगी सावकार राजू जाधव यांच्याकडून घेतलेल्या कर्जापोटी ३ लाख ४ हजार २०० रुपये महिंद्रा फायनान्स कंपनीत पैसे भरले. तसेच जाधव याला १० लाख रुपये व्याज दिले. तसेच १५ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत सावकार राजू जाधव याच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर ७ लाख १० हजार रुपये व्याजासहीत भरले होते.

तरी देखील खाजगी सावकर जाधव याने त्याचेकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशाच्या बदल्यात आणखीन ४ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम देण्यास प्रविण पाटील यांनी नकार दिल्याने सावकाराने त्याच्या स्कार्पीओ गाडीच्या हप्त्याची रक्कम भरण्यास सांगितले. याला देखील पाटील याने नकार दिल्याने खाजगी सावकार जाधव याने स्वतःच्या मोबाईलवरुन पाटील यांना फोन केला. तसेच त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळी करुन, ठार मारण्याची धमकी दिली. अखेर खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून प्रवीण पाटील यांनी कुटुंबासह राजवाडा पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष राजू जाधव याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

Related Stories

उपराष्ट्रपदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांचे नाव जाहीर

Abhijeet Khandekar

योगग्राम सांबरवाडीत घराघरात योगा

Archana Banage

पेट्रोलचा प्रवास ७२ पैशावरुन १२० रुपयांकडे

Archana Banage

महाराष्ट्रात 17,066 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

तिरुपती-कोल्हापूर विशेष एक्सप्रेस रद्द

Archana Banage

ज्या निवडणुका आरक्षणाशिवाय झाल्या त्याचं पाप कुणाचं; फडणवीसांचे मविआवर टीकास्त्र

Abhijeet Khandekar