दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन
प्रतिनिधी / सांगरूळ
आयुष मंत्रालयाकडून वाटप करण्यात येत असलेल्या आर्सेनिक अलबम या होमिओपॅथिक गोळ्यांची नियमापेक्षा जादा मागणी करत ज्यादा गोळ्या दि .ल्या नाही म्हणून करवीर तालुक्यातील खाटांगळे येथे आशा वर्करला मारहाण केली . याबद्दल ग्रामपंचायत सदस्यासह सहा जणांच्या विरोधात करवीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणार्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत करवीर तालुक्यातील सर्व आशा वर्करसनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून व करवीर पोलीस स्टेशन मधून मिळालेली अधिक माहिती अशी की खाटांगळे तालुका करवीर येथील शोभा अशोक तळेकर (वय ४२ ) या प्राथमिक आरोग्य केंद्र सांगरुळ या आरोग्य केंद्रांतर्गत अशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत . रविवार दिनांक सात जून रोजी गावामध्ये त्या महाआयुष कामकाजाचा सर्वे करत होत्या .यावेळी त्या घरोघरी माहिती पत्रक व आयुष मंत्रालयाकडून पन्नास वर्षे वयाच्या वरील व्यक्तींना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अर्सनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करत होत्या . वरिष्ठांच्या सूचनेनुसार या गोळ्या फक्त पन्नास वर्षे वयाच्या वरील व्यक्तींना वाटप करायच्या होत्या याबाबतची पात्र व्यक्तींची यादी सुद्धा या अशा वर्कर यांच्याकडे दिली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्या वैशाली कृष्णात पाटील यांच्या घरी शोभा तळेकर गेल्या असता तेथे ज्यादा गोळ्यांची मागणी केली . यावेळी तळेकर यांनी पन्नास वर्षे वयाच्या वरील व्यक्तींना औषधे द्यायची आहेत, पन्नास वर्षे वयाच्या आतील व्यक्तीना औषधे द्यायची नाहीत अशा आम्हाला वरिष्ठ कडून सूचना आहेत . पात्र व्यक्तींची यादी आम्हाला दिली आहे यानुसारच गोळ्यांचे वाटप करायच्या सक्त सूचना आम्हाला आहेत .यामुळे आम्हाला जादा औषधे देता येत नाहीत .यानंतर ज्यादा गोळ्यांची उपलब्धता झाली तर तुम्हाला मी देईन असे सांगण्याचा प्रयत्न शोभा तळेकर यांनी केला .मागूनही औषध न दिल्याचा राग मनात धरून वैशाली कृष्णात पाटील यांचे सह
कृष्णात बापू पाटील ,एकनाथ बापू पाटील ,पंडित बापू पाटील या चौघांनी मारहाण केली .याबाबत शोभा तळेकर यांनी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यामध्ये चौघाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे .परंतु एकाच व्यक्तीवर कारवाई सुरू आहे .या घटनेचा निषेध करून जोपर्यंत चारही दोषींना अटक होत नाही तो पर्यंत करवीर तालुक्यातील आशा वर्करचे सर्व काम बंद करण्याचा निर्णय आशा वर्कर संघटनेने घेतला आहे , कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध केला असूून दोषींवर ताबडतोब कारवाई न केल्यास जिल्ह्यातील आशा वर्कर्स काम बंद आंदोलन करतील असा इशारा कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनने दिला आहे.
दोषींवर कडक कारवाई करावी
कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा वर्कर्स ग्राम दक्षता समितीच्या सूचनांनुसार प्रामाणिकपणे गावोगावी काम करत आहेत .सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू असते . तटपुंज्या मानधनावर कामकाज करणाऱ्या अशाना गावोगावी कोणाच्या काळात घरोघरी जाऊन सर्वे करताना नागरिकांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .काही गाव गुंडा कडून अवमानकारक वागणूक मिळत आहे . सध्याच्या या संकटकाळात ग्रामपंचायतीत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी गावाच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे ते बाजूलाच राहिले पण स्वतःचा दिमाख दाखवण्यासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या अशांना मारहाण करणे पर्यंत ही मजल गेली आहे .वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून दोषींवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अशा वर्कर्स काम बंद आंदोलन करून अन्यायाविरुद्ध लढा उभारतील.

