Tarun Bharat

खाणी सुरू करण्यासाठी आता दिल्लीत बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी आता दिल्लीत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा खाणमालक, निर्यातदार संघटना, केंद्रीय खाणमंत्री आणि गोवा राज्य सरकार अशी ही बैठक होणार असून त्यासाठी केंद्रीय खाणमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागण्यात आली आहे.

निर्यातदार संघटनेकडे खाणी सुरू करण्याच्या विषयावर चर्चा केल्यानंतर माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

ते म्हणाले की, खाणी कशा सुरू करता येतील या अनुषंगाने संघटनेबरोबर विचारविनिमय झाला. एमएमडीआर कायदा व इतर कायद्यातून खाणी सुरू करण्यास वाव आहे की नाही? यावर मंथन झाले. खाणींचा विषयही सर्वोच्च न्यायालयात असून तेथेही फेरविचार याचिका सादर करण्यात आलेली आहे. न्यायालयीन मार्गाने खाणी सुरू करण्यावर भर देण्यात येणार असून कोणत्या ना कोणत्या मार्गाने खाणी सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लिजांच्या नूतनीकरणाचा लाभ मिळायला हवा होता

येत्या काही दिवसात किंवा पुढील आठवडय़ात दिल्ली येथे खाणप्रश्नी बैठक घेण्याचे निश्चित झाले असून त्यात काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली आहे. कायदेशीर मार्गानेच खाणी सुरू करण्याचा सरकारचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. खाण लिजांच्या दुसऱया नूतनीकरणाचा लाभ गोव्याला मिळायला हवा होता परंतु तो मिळालेला नाही. तो मिळविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील. खाणी सुरू करण्यासाठी आता उच्च पातळीवर हालचाली गतीमान झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे देशात रामराज्य येणार

Patil_p

चतुर्थी सणासाठी पेडणेतील जनता सज्ज , महागाई आणि कोरोना संकटातही गणेश भक्तांचा उत्साहाला उधाण , उत्सवावर पावसाचे सावट

Amit Kulkarni

कुठ्ठाळीतील कला भवन ठरणार आदर्श : अलिना

Amit Kulkarni

माशेलची महाशाला कला संगम उत्कृष्ट संस्था

Amit Kulkarni

सिम्युलेटर बांधण्यासाठी गोवा शिपयार्ड व नौदलामध्ये करार

Omkar B

शाळा सुरू करण्यास पालक शिक्षक संघांचा विरोध

Patil_p
error: Content is protected !!