Tarun Bharat

खादरवाडी विनायक नगरात साकारलेला तोरणा गड

वार्ताहर/ किणये

विनायक नगर खादरवाडी येथील कलाग्रुपच्यावतीने गल्लीमध्ये तोरणागड किल्ला बनविलेला आहे. सदर किल्ला हा आकर्षक असून गावातील शिवभक्त हा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर किल्ल्यांचे मोठय़ा थाटात उद्घाटन करण्यात आले आहे.

कलाग्रुपच्यावतीने किल्ला बनविलेल्या परिसरात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले आहे. किल्ला बनविण्यासाठी या ग्रुपला 15 दिवस लागलेले आहेत. या किल्ल्याचे प्रवेशद्वार तसेच किल्ल्यातील भवानीमातेचे मंदिर व किल्ल्यातील अंतर्गत भाग अगदी उत्तमप्रकारे बनविण्यात आला आहे.

हा किल्ला बनविण्यासाठी प्रविण पाटील, जतीन पाटील, यल्लाप्पा पाटील यांनी परिश्रम घेतलेले असून या तरुणांचे कौतुक होत आहे.

Related Stories

आता मयतांच्या नावेही फ्रेंड रिक्वेस्ट

Omkar B

काकती सर्व्हिस रस्त्यावर वाहनांची वर्दळ

Omkar B

पाऊस, ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत

Patil_p

देश, धर्म रक्षणासाठी युवकांनी एकत्र येण्याची गरज

Amit Kulkarni

कॅटलशेडच्या अर्धवट कामामुळे भटकी जनावरे मोकाट

Patil_p

युवराज हॉटेलचे थाटात उद्घाटन

Amit Kulkarni