Tarun Bharat

खानापुरात जनता आधार सौहार्द सहकारीचे उद्घाटन

Advertisements

प्रतिनिधी / खानापूर

येथील चिरमुरकर गल्लीत जनता आधार सौहार्द सहकारी नियमित सोसायटीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरमाणी पाटील होते.

प्रारंभी स्वागताध्यक्ष संस्थेचे संचालक पांडुरंग देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून सोसायटीची स्थापना करण्यामागचा उद्देश विशद केला. यानंतर अवरोळी रुद्रस्वामी मठाचे चन्नबसव देवरु यांच्या हस्ते सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, महालक्ष्मीचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर यावेळी विविध देवदेवतांचे पूजन भूविकास बँकेचे माजी संचालक विश्वनाथ डिचोलकर, प्रकाश चव्हाण, कृष्णा कौंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर ठेव पावतीचे अनावरण माजी नगरसेवक विवेक गिरी यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना यशवंत बिरजे म्हणाले, एखाद्या संस्थेची प्रगती त्याला लाभलेल्या संचालक मंडळ व कर्मचारी वर्गावरच अवलंबून आहे. प्रामाणिक व पारदर्शकता राखल्यास कोणत्याही संस्थेची भरभराट होण्यास वेळ लागणार नाही. याची जाण सोसायटीच्या संचालकांनी ठेवावी, अशी विनंती त्यांनी केली. शेवटी संचालक मोहन मुळीक यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी गुंजीकर तसेच संचालक पांडुरंग देसाई, परशराम नांदूरकर, बळीराम खन्नूरकर, प्रभाकर के. पाटील, रमेश कौंदलकर, चंद्रकांत आर. मेदार, मंजुनाथ बागेवाडी, कऱयाप्पा बेकिनकेरी, कल्पना सावंत, सविता एम. गडाद तसेच सीईओ एस. पी. पाटील व संस्थेचे सल्लागार मंडळ, भागधारक व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

हुतात्मा राहुल भैरू सुळगेकर यांच्या पुतळय़ाचा आज अनावरण समारंभ

Amit Kulkarni

मराठी-कन्नड शाळांना 8 संगणकांचे वितरण

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटमधील पथदीप दिवसाही सुरूच

Amit Kulkarni

कंग्राळीत आयुर्वेदिक औषधांचे वितरण

Amit Kulkarni

मटका बुकींच्या घरांमध्ये पोलिसांची शोध मोहीम

tarunbharat

कोरोनाची धास्ती… शहराला सुस्ती

tarunbharat
error: Content is protected !!