Tarun Bharat

खानापुरात 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाळा

म. ए. समितीचे आवाहन

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुका म. ए. समिती कार्यकर्त्यांची बैठक शिवस्मारकात झाली. यामध्ये दि. 1 नोव्हेंबरला तालुक्यात कडकडीत हरताळ पाळून सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत स्टेशनरोडवरील लक्ष्मी मंदिरात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव होते.

प्रारंभी म. ए. समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत व इतरांनी आपले विचार व्यक्त केले. काळय़ादिनासंदर्भात तसेच त्या दिवशी होणाऱया लाक्षणिक उपोषणासंदर्भात विभागवार बैठका घेऊन जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला सूर्याजी पाटील, गोपाळ पाटील, संभाजी देसाई, पी. एच. पाटील, गोपाळ देसाई, कृष्णा कुंभार, पुंडलिक पाटील, राजाराम देसाई, मारुती पर्मेकर, मनोहर पाटील, रामचंद्र पाटील, अजित पाटील, सहदेव हेब्बाळकर, विनायक सावंत, अर्जुन केसरकर आदी उपस्थित होते..

Related Stories

शेतकऱयांना त्वरित नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni

कालिकादेवीचा वर्धापनदिन साजरा

Patil_p

राज इलेव्हन, नरवीर, डीबी स्पोर्ट्स, अल रजा विजयी

Amit Kulkarni

सकाळी गर्दी… दिवसभर शांतता

Patil_p

आरसीयूच्या कारभाराची उच्च शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

Amit Kulkarni

गोल्ड्स जीममध्ये शिवजयंती साजरी

Patil_p