Tarun Bharat

खानापूरची माती म्हणजे शिंपल्यातला मोती

तालुक्यात मातीतल्या कुंभारी कलासह वीट, वाळू, शाडू व्यवसाय आर्थिक बळ देणारा : पण अनेक  अडचणीमुळे व्यावसायिक अडचणीत

पिराजी कुऱहाडे / खानापूर

खानापूर तालुक्याततील माती म्हणजे शिंपल्यातून मोती कमावणे इतके अनन्य महत्त्व या मातीला आहे. तालुक्यातच्या वेगवेगळय़ा भागात मातीचे अनेक प्रकार आहेत. भू-गर्भ व खनिज विभागाने तालुक्याततील विविध भागात मातीचे परिक्षण करून वेगवेगळय़ा व्यवसायाना वृद्धी दिली आहे. उतम दर्जाच्या शेती पीक उत्पादनासाठी तालुक्याततील माती लाभदायक ठरली आहे. भात, रताळी, ऊस, काजू लागवड तसेच बागायतीसाठी तालुक्याततील मातीचा बळीराजाला मोठा आधार बनला आहे. शिवाय तालुक्यातत दर्जेदार मातीतून उत्पादीत होणारी कुंभारी कला, वीट व्यवसायाला महत्त्व आहे.

 तालुक्यातत दरवषी तब्बल 25 ते 30 कोटी पेक्षा अधिक विटांचे उत्पादन केले जाते. शिवाय याच मातीतून निर्माण होणारी वाळू, शाडूयुक्त मातीतून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तालुक्याततील आर्थिक उत्पन्नाला बळ देणारा ठरला आहे. पण कोरोना महामारीनंतर तालुक्यातत आर्थिक उत्पन देणाऱया या मातीतल्या व्यवसायाला मरगळ आली आहे.

खानापूरची चिनी माती, शेडू, वाळू अत्यंत प्रसिद्ध असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यावर आधारीत उद्योगधंद्यांना या तालुक्यात बरीच चालना मिळाली होती. 1945 साली सिरॅमिक कारखाना, राजा टाईल्स कंपनी, नाईक टाईल्सवर पॉयोनियर क्ले इंड्रस्टिज यासारखी मंगळुरी कौले तयार करणाऱया कारखान्यानी बऱयाच लोकाना रोजगार दिला होता. या सर्व कारखान्यांमुळे खानापूरच्या आर्थिक उन्नतीतही भरभराट होती. पण बदलत्या परिस्थितीत सर्व कारखाने हळुहळू बंद पडून बेरोजगारी वाढली. त्यामुळे उपजीविकेचा आधार बनलेल्या वीट, वाळू व्यवसायावरही शासनाचे निर्बंध आल्याने अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.

अनेक सर्वसामान्य वीट व्यवसाय करणारी कुटुंबे एकाहून अधिक व्यावसायिकाकडून रक्कम उचलतात. मात्र वीट व्यवसाय सुरू झाला की त्यांना हात देऊन दुसरीकडे जाण्याचे प्रकार वाढल्याने अनेक व्यवसायिकांची लाखोची रक्कम अशा फसवणूक करणाऱया कामगारांच्या घशात गेली आहे. त्यामुळे मजुरांवर आधारित हा वीट व्यवसाय करणे अवघड बनले आहे.

वीट व्यवसायावर टांगती तलवार

हल्याळ, धारवाड, गोकाक, यमकनमर्डी अशा विविध भागातून हजारो कामगार दरवषी खानापूर तालुक्यातत आपले तळ ठोकून या व्यवसायावर रोजीरोटी कमवतात. त्यामुळे तालुक्याततील वीट व्यवसायाला आता जोमाने सुरुवात झाली आहे. पण शासनाच्या काही निर्बंधांमुळे वीट व्यवसायावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. खनिज व भूगर्भ विभागाने वीट व्यवसाय करणाऱया बऱयाच शेतकऱयांना मागील वषी नोटिसा बजावून ज्या जमिनीवर व्यवसाय केला जातो त्या जमिनीत बिगर शेती करून हा व्यवसाय करावा, अशी सूचना केल्याने व्यावसायिकांत धास्ती निर्माण झाली आहे. 

 मातीतली कला, कुंभारी साधणे

 आजच्या वैज्ञानिक युगात कुंभारी कलेला मोठी मागणी आहे. अलीकडे चायनिज वस्तू, प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या वस्तूमूळे वाढणारे प्रदूषण टाळण्यासाठी कुंभारी कलेतील नवनवीन कलाकृतीना वाढती मागणी आहे. कुंभार शाळेतील भांडी महाराष्ट्र, गुजरातमधील एजंटाकडून नेपाळ, चीन, जर्मनी, अमेरिकापर्यंत पोहचली आहेत. मातीच्या आकारावर तयार केलेल्या बुद्धाचा मुखवटा नेपाळला तर दही-ताकासाठी लागणाऱया छोटय़ा लोटक्यांची कर्नाटकासह दक्षिण भारतात मोठी मागणी आहे.

या व्यवसायातून बारा महिने रोजगार मिळू शकतो. या कलेतील गार्डन, मनीबॅक, गिप्ट वस्तू, लहान मुलांची खेळणी यासारख्या मातीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे.

 वाळू व्यवसायाला मरगळ

शेती व्यवसाय वगळता तालुक्याचे आर्थिक स्त्रोत्र प्रामुख्याने वाळू उपसा व वीट उत्पादनावरच अवलंबून आहे. असे असताना खासगी जमिनीत होणाऱया वाळू उपशावर निर्बंध कायम लादले असल्याने वाळू व्यवसायाला मरगळ आली आहे.

या पाठोपाठ मातीतला उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शाडू होय. खानापुरातील उत्तम दर्जाच्या शाडूला महाराष्टासह गोवा कर्नाटकात मोठी मागणी आहे. रासायनिक खताच्या निर्मितीसाठी शाडूचा मोठा वापर होतो.

आर्थिक उत्पन देणारा वीट व्यवसाय

तालुक्याततील मातीतल्या भाजलेल्या विटांना घर बांधणीसाठी मोठी मागणी आहे. तालुक्याततील विटा गोवा, महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक भागात मागणीनुसार पुरवठा केल्या जातात. तालुक्याततील माती विटाना उतम असल्याने येथील विटाना चांगला भाव मिळातो. तालुक्यातच्या मध्यवर्ती पट्टय़ातील विटाना एक हजारला पाच हजारहून अधिक दर मिळत असल्याने सर्वसामान्य वीट व्यावसायिकांना चांगलाच लाभ मिळाला. परंतु तालुक्यातत अनेक व्यवसाय करणारे लोक कर्ज काढून व्यवसाय करतात. तालुक्याततील गर्लगुंजी, निट्टूर, इदलहोंड, हत्तरगुंजी, अंकले, बिदरभावी तसेच नंदगड, खैरवाड, कसबा नंदगड, माडीगुंजी, चापगाव, हडलगा या भागातही मिळणारी माती भक्कम व्यवसायाला पूरक मानली जाते.

वाळू व्यवसायावर अवकळा

खानापूर तालुक्यात वाळू व्यवसाय पूर्वांपार चालू होता. तो आर्थिक उत्पन देणारा आहे. येथील वाळू चांगल्या दर्जाची असल्याने याला कर्नाटकाबरोबर महाराष्ट्र व गुजरात राज्यातूनही चांगली मागणी आहे. पण गेली चार वर्षे वाळू उपसा व्यवसायावर कडक निर्बंध घातल्यामुळे वाळू उपसा पूर्णपणे बंद झाला आहे. पूर्वी नदी नाल्यातील वाळू मनुष्य बळावर काढली जात होती. यामुळे त्याचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नव्हता. पण कालांतराने वाळू उपसा करण्याच्या पद्धतीत बदल होऊन यंत्राद्वारे वाळू उपशा करण्याची पद्धत सुरू झाली. याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होऊ लागला. नदी नाल्यातील पाणी गढूळ झाल्याने पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली.

Related Stories

वाहतूक दक्षिण विभागाच्या आठ पोलिसांना कोरोना

Patil_p

भिंतीवर साकारले शिवरायांचे चित्र

Patil_p

श्रीगणेश कणबर्गी, पीजे वॉरियर्स, इंडियन बॉईज, एसएस मुचंडी संघ उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

बीआयईसी येथे कोविड केअर सेंटरची तयारी अंतिम टप्प्यात

Archana Banage

नंदगड बाजाराच्या प्रवेशद्वारावरच कचरा-घाणीचे साम्राज्य

Amit Kulkarni

तब्बल दोन महिन्यानंतर कांदा सौदेबाजीला प्रारंभ

Amit Kulkarni