Tarun Bharat

खानापूरचे निजद नेते रियाज पटेल समर्थकांसह काँग्रेसमध्ये दाखल

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर तालुक्यातील निजद पक्षाचे नेते, भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रियाज अहमद पटेल यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी बेळगाव येथील गांधी भवनमध्ये झालेल्या समारंभात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी तसेच आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

 काँग्रेसच्या ध्येय-धोरणांशी बांधील राहून पक्षाचा विकास आणि सर्वधर्म समभावाचा विचार तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानेच तसेच आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडून तालुक्यात होत असलेल्या विकासकामाला बळ देण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची महिती रियाज अहमद पटेल यांनी यावेळी दिली. भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, खानापूर तालुका अंजुमन संघटनेचे चेअरमन आणि विविध सामाजिक संस्थांवर त्यांनी काम केले आहे. सर्वांगीण विकासाचा विचार, स्वच्छ, निष्पक्ष आणि निधर्मी विचारधारेवर आधारित काँग्रेसच्या प्रवाहात सामील होण्याच्या रियाज पटेल यांच्या या निर्णयाचे आमदार अंजली निंबाळकर यांनी स्वागत केले. पटेल यांच्या प्रवेशाने पूर्व भागात आणखी एक मोठा चेहरा काँग्रेस संघटनेसाठी मिळाला आहे, असे त्या म्हणाल्या.

Related Stories

कोल्ड्रिंक्स चालकांनाही आर्थिक मदत करा

Patil_p

खराब रस्त्यांची कामे त्वरीत सुरु करा

Patil_p

आशा कार्यकर्त्यांना किमान 12 हजार वेतन द्या

Patil_p

दुरुस्तीनिमित्त विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

उच्च शिक्षणमंत्री अश्वथनारायण यांची मराठा मंडळ संस्थेस भेट

Omkar B

रोजगार हमी योजनेत बेळगाव जिल्हा राज्यात प्रथम

Amit Kulkarni