Tarun Bharat

खानापूरचे माजी नगराध्यक्ष रफिकसाब खानापुरी यांचे निधन

वार्ताहर / खानापूर

खानापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक तसेच काँग्रेसचे खंबीर नेतृत्व रफिकसाब खतालसाब खानापूरी वय 55 यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. रफिकसाब खानापुरी हे भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे माजी संचालक म्हणून परिचित होते. शिवाय त्यानी 2004, 2008, 2013 मध्ये अशा तीन वेळा खानापूर ब्लॉक काँग्रेसच्यावतीने विधानसभेची निवडणूक लढवली होती. शिवाय खानापूर नगरपंचायतीचे चार वेळा नगरसेवक म्हणून यशस्वी धुरा सांभाळली त्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून त्यांनी 1997, 2003 मध्ये दोन वेळा यशस्वी कार्य केले. शिवाय ते विद्यमान नगरसेवक म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता खानापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे आणि प्रशांत देशपांडे यांनी शोक व्यक्त केला आहे.

Related Stories

ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी 5 एकर जागा मंजूर करा

Patil_p

ग्रामीण भागातील जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी

Amit Kulkarni

औद्यौगिक वसाहत निर्माणचे काम बंद पाडणार!

Patil_p

तहसीलदार कार्यालयातील उतारा केंद्र बंद

Patil_p

श्रीपेवाडीत 550 जणांना कोरोना प्रतिबंधक लस

Omkar B

खासगी टय़ूशनवर शिक्षण विभागाकडून येणार नियंत्रण

Patil_p