Tarun Bharat

खानापूर तालुका प्राथ.शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा उत्साहात

प्रतिनिधी/ खानापूर

दि खानापूर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मराठी मुलांची शाळा चुरमुरकर गल्ली येथे झाली.

अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन बी. एम. पाटील होते. सूत्रसंचालन जी. टी. पाटील यांनी केले. आदित्य चोर्लेकर या विद्यार्थ्याच्या ईशस्तवनानंतर चेअरमन पाटील यांनी फोटो पूजन केले. नवनिर्वाचित संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पाटील यांनी प्रास्ताविक तर प्रोसिडींगचे वाचन प्रभारी सेक्रेटरी एन. वाय. पाटील यांनी केले.

संचालक मंडळाच्यावतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांना मानचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले.

संचालक मंडळाने कर्जमर्यादा 3,00,000 रु.वरून 5,00,000 रु. केली आहे. सोसायटीच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या हलकर्णी येथील जागेच्या केसचा निकाल सोसायटीच्या बाजूने लावण्यात यश संपादन करून सोसायटीचे लाखो रुपयांचे नुकसान टाळले आहे. या कामी सोसायटीचे वकील सुधीर गावडे व सुधीर सक्री तसेच सर्व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. दि. 31-03-2020 ला सोसायटीच्या सभासदांची संख्या 550 असून शेअर भांडवल 95,23,665 रु., राखीव निधी रु. 4971445 तर इमारत निधी रु. 16,40,833 इतका आहे.

या आर्थिक वर्षात सोसायटीला रु. 15,77,403 इतका निव्वळ नफा झाला असून 11 टक्के लाभांश देण्याची शिफारस केलेली आहे. सोसायटीचे कामकाज व प्रगतीबाबत सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले. व्हा. चेअरमन ओ. एन. मादार यांच्या आभार प्रदर्शनानंतर वंदेमातरमने सभेची सांगता झाली.  

Related Stories

सलग सुटय़ांमुळे सोमवारी बँकांमध्ये गर्दी

Patil_p

40 ग्राम पंचायतींना मिळणार कचरावाहू वाहने

Omkar B

गणेशोत्सवा संदर्भात शांतता समिती बैठक

Patil_p

घरोघरी जाऊन कचऱयाची उचल; तरीही रस्त्याशेजारी कचऱयाचे ढीग

Patil_p

‘लोकमान्य’च्या कॅम्प शाखेचे नव्या वास्तुत स्थलांतर

Amit Kulkarni

कपिलेश्वर रोड परिसरातील नागरिक आक्रमक

Patil_p