Tarun Bharat

खानापूर तालुका म. ए.युवा समितीची रचना लवकरच

लक्ष्मी मंदिरमध्ये झालेल्या युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

वार्ताहर / खानापूर

खानापूर तालुका म. ए. युवा समितीची रचना करण्याचा निर्णय सोमवारी लक्ष्मी मंदिरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ऍड. अरुण सरदेसाई होते.

स्वागत व प्रास्ताविक नारायण पाटील यांनी केले. तालुक्मयात युवा समितीची रचना का करावी, यासंदर्भात त्यांनी विचार मांडले. यावेळी चर्चेत खानापूर तालुक्मयात गेल्या दहा वर्षांत म. ए. समितीचे दोन गट झाल्याने मराठी माणूस विभागला गेला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्मयात मराठी माणसाचे नेतृत्व करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यासाठी एक तर खानापूर तालुक्मयातील दोन्ही समित्यांनी एकत्रित येऊन तालुक्मयातील मराठी माणसाला एकत्रित आणून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी वज्रमूठ कायम ठेवावी. न झाल्यास म. ए. समिती युवा समितीची रचना करून या युवा समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्मयातील मराठी तरुणांची व मराठी भाषिकांची एकजूट करावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला उपस्थित सर्व युवा वर्गाने एकमताने संमती दिली. या संदर्भात पुन्हा एकदा दोन्ही समित्यांच्या नेत्यांची अंतिम चर्चा करून सकारात्मक उत्तर न मिळाल्यास आठवडय़ाभरात युवा समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 बैठकीत समितीच्या नि÷ावंत कार्यकर्त्यांचा युवा समितीत समावेश करून समन्वय समितीची रचना करण्यात आली. त्यामध्ये खानापूर शहर व मराठी भागात येणाऱया जि. पं. निहाय समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली. या समन्वय समितीने समितीच्या पदाधिकाऱयांनी विभागवार बैठका घेऊन व्यापक बैठक खानापुरात बोलावून युवा समितीच्या कार्यकारिणी समितीची घोषणा करावी असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव होते त्यांनी या युवा समिती रचना करण्यासंदर्भात आपल्या गटाचा पाठिंबा दर्शविला.     

बैठकीला धनंजय पाटील, राजू कुंभार, रणजीत पाटील, मारुती गुरव, विनोद पाटील, विनायक सावंत, सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर, किरण पाटील, पिराजी कुऱहाडे, आनंद मारुती जुंजवाडकर, आपन्ना इलान, पुंडलिक पाटील, बाळकृष्ण पाटील, विनायक सावंत, संतोष चिनवाल, राजू पाटील, नारायण पाटील, महादेव हटोलकर, स्वागत पाटील, राजाराम देसाई, भूपाल पाटील उपस्थित होते.

Related Stories

‘त्या’ दोन मृतदेहांवर बेळगावात दफनविधी

Patil_p

कोरोनामुळे आंब्याचा गोडवा हरवला

Patil_p

ध. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

Amit Kulkarni

सुगीच्या तेंडावरच जनावरांचा बाजार बंद

Amit Kulkarni

बेळगावच्या रताळय़ाला वाढली मागणी

Omkar B

शवागारात 9 मृतदेह तर अहवालात दोनच नोंद

Patil_p