Tarun Bharat

खानापूर तालुक्यात शुक्रवारी पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद

Advertisements

तालुक्यात बाधितांचा आकडा 109 : तालुक्यात 35 जण झालेत कोरोनामुक्त

वार्ताहर / खानापूर

खानापूर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसात कोरोना बाधितांची संख्या घटलेली दिसत होती. त्यामुळे तालुक्मयाला दिलासा मिळाला होता. पण शुक्रवारी आलेल्या सरकारी बुलेटीन नुसार खानापूर तालुक्यात आणखी पंधरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तालुक्मयातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 109 वर पोहचली आहे.

शुक्रवारी आलेल्या 15 पॉझिटिव्ह मध्ये नऊ महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे यापैकी पाच जण खानापूर शहर परिसरातील असून त्यामध्ये 60 व 50 वषीय दोन पुरुष तर 51, 43 आणि 33 वषीय तीन महिला आहेत. तसेच गांधीनगर हुडको कॉलनी खानापूर मध्ये एक 60 वषीय महिला व 70 वषीय पुरुषाचा समावेश आहे. तर लोंढा मंगळवार पेठ मध्ये एक 46 वषीय महिला, माचीगड येथे 26 वषीय पुरुष, निडगल येथे 23 वषीय महिला तर गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न 28 ,29, 27 वषीय तीन महिलांचा समावेश आहे, तर इटगी येथे 38 व 32 वषीय दोन पुरुषांचा समावेश आहे. तालुक्मयात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 109 वर पोहोचली असली तरी त्यापैकी 35 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. तालुक्मयातील वाढत्या या आकडेवारीमुळे ग्रामीण भागातही आता धास्ती निर्माण झाली आहे.

Related Stories

काळिमा फासणाऱ्या ‘त्या’ घटनेविरोधात विविध संघटनांचा एल्गार

Patil_p

अन् वाहन रुतले रस्त्यात !

Tousif Mujawar

ए. एच. मोतीवाला यांना आदर्श रत्नशास्त्री पुरस्कार

Patil_p

विनामास्क फिरणाऱयांकडून चार लाखाचा दंड वसूल

Patil_p

कंझ्युमर आयुक्त फोरमसाठी आंदोलन

Amit Kulkarni

जागा विनियोगाच्या प्रस्तावावर कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!