Tarun Bharat

खानापूर तालुक्यात सोमवारी आणखी 14 कोरोनाबाधित रुग्णांची भर

खानापूर शहरात 9 तर लैला शुगर साईटवर 4 तर लोंढय़ात एक बाधिताची नोंद

खानापूर/ वार्ताहर

खानापूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच सुरू आहे. सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार खानापूर तालुक्यात 14 नव्या रुग्णांची भर पडली  असून यामध्ये खानापूर शहर परिसरातील 9 रुग्णांचा समावेश आहे. खानापूर शहरांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये विद्यानगर येथे  4 पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यामध्ये 36, 28, 36, व 17 वयोगटातील पुरूषांचा समावेश आहे.  तर प्रभूनगर खानापूर येथे एका 31 वषीय पुरुष,  फॉरेस्ट खाते खानापूर येथे 31 वषीय पुरुष, खानापूर नगरपंचायत मध्ये 25 वषीय पुरुष, खानापूर मयेकर नगरमध्ये 35 वषीय पुरुष, तर खानापूर बस आगारात 29 वषीय एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर लोंडा येथे एका 35 वषीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. त्याप्रमाणे कोरोना बाधित मृत्यू झालेल्या खानापूर हॉटेल चालकाच्या संपर्कात आलेल्या 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामध्ये 40 व 30 वषीय दोन महिला तसेच 12 वषीय एक बालक व 43 वषीय पुरुषाचा समावेश आहे. एकूणच खानापूर शहर परिसराभोवती कोरोनाने विळखा घट्ट केला असून शहराच्या विविध भागांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने धास्ती वाढत चालली आहे.

Related Stories

कुणी लस देता का लस!

Patil_p

बॉक्साईट रोडवर गांजा विकणाऱया जोडगोळीला अटक

Tousif Mujawar

रेल्वे दुपदरीकरण गोव्याच्या विकासासाठीच

Omkar B

लोकमान्य श्रीराम मंदिरामध्ये तिळगूळ समारंभ

Amit Kulkarni

शिवारात जाण्यासाठी ‘तो’ रस्ता खुला करा

Amit Kulkarni

शहराच्या प्रवेशद्वारावरच कचऱयाची समस्या

Amit Kulkarni