Tarun Bharat

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मजहर खानापुरी

Advertisements

उपनगराध्यक्षपदी लक्ष्मी अंकलगी : बिनविरोध पार पडली निवडणूक

 प्रतिनिधी / खानापूर

आज खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. नगराध्यक्षपद सामान गटासाठी आले होते. ही निवडणूक बिनविरोध पार होण्यासाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मध्यस्थी करून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेतले होते. त्यानुसार आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत  मजहर रफिकसाब खानापुरी यांची तर उपनगराध्यक्षपदी लक्ष्मी अंकलगी यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली यावेळी मजहर खानापूरी यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मी अंकलगी यांचा एकमेव अर्ज पात्र ठरल्याने त्यादेखील बिनविरोध निवडून आल्या. निवडणूक अधिकारी म्हणून खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी प्रक्रिया पार पडली. दुपारी तीन वाजता सदर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड त्यांनी घोषित केल्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवकांनी उभयतांचे अभिनंदन केले. नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला. आज झालेल्या निवडणुकीवेळी 19 पैकी 17 नगर सेवक व नगरसेविका उपस्थित होत्या तर दोन नगरसेवक यावेळी अनुपस्थित होते.

Related Stories

जिल्हय़ात मंगळवारी 38 नवे रुग्ण

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात कोरोना बळींची मालिका सुरुच

Rohan_P

सलग दुसऱया वषीही पायी दिंडय़ांना ब्रेक

Amit Kulkarni

तरुण भारतच्या वृत्ताची हेस्कॉमकडून दखल

Amit Kulkarni

नौदल वाद्यवृंदांकडून अप्रतिम संगीत मैफल

Amit Kulkarni

विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी आज बेळगावात

Amit Kulkarni
error: Content is protected !!